तेलंगणा कारखाना स्फोटातील मृतांची संख्या ४० वर   

नऊ जण अद्याप बेपत्ताच

हैदराबाद : तेलंगणा फार्मा कारखान्यातील स्फोटातील मृतांची संख्या ३९ वरून ४० वर पोहोचली. शनिवारी आणखी एका जखमी कामगाराचा मृत्यू झाला. सध्या १९ जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून, ९ जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रशेखर बडुगु यांनी सांगितले.पसुमिल्लाराम औद्योगिक क्षेत्रातील सिगाची इंडस्ट्रीजमध्ये सोमवारी सकाळी 
 
९.३० च्या दरम्यान स्फोट झाला. त्यावेळी कारखान्यात १५० कामगार काम करत होते. स्फोट झाला त्या ठिकाणी ९० कामगार कार्यरत होते. आगीच्या भडक्यात अनेक कामगार होरपळले. बचाव आणि वैद्यकीय पथकांनी त्याच दिवशी ३१ मृतदेह बाहेर काढले. तर इतर जखमींवर उपचार सुरू होते. मृतांचा आकडा आता ४० वर पोहोचला आहे. 
 
दरम्यान, कंपनीने मृतांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपये, गंभीर जखमींना १० लाख रुपये आणि इतर जखमींना ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. अणुभट्टीमध्ये जलद रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळे स्फोट झाल्याचे सांगण्यात येते.

Related Articles