डॉ. नवलगुंदकर यांना श्रद्धांजली   

पुणे : माजी प्र-कुलगुरू आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. श. ना. नवलगुंदकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, अधिष्ठाता प्रा. डॉ. विजय खरे, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ.प्रभाकर देसाई आणि विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
 
डॉ. नवलगुंदकरांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले. तसेच त्यांनी  विद्यापीठामधील  त्यांच्या कारकिर्दीत विद्यापीठाच्या शैक्षणिक कामकाजातही मोलाचे योगदान दिले असल्याचे  कुलगुरू प्रा. डॉ. गोसावी यांनी त्यांना आदरांजली वाहताना सांगितले. दिवंगत डॉ. नवलगुंदकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्र्वर सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. नवलगुंदकर यांनी १९८७ ते १९८८ या कालावधीत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून काम पाहिले होते.

Related Articles