विजयी मेळाव्यानिमित्त मनसे-उद्धव शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे मनोमिलन   

पिंपरी :उद्धव आणि राज ठाकरे बंधूंच्या वरळी डोम येथे शनिवारी झालेल्या विजयी मेळाव्यास पिंपरी चिंचवड मधील उद्धव ठाकरे गटाचे  शिवसैनिक व मनसैनिक यांनी उपस्थिती दर्शवली. यानिमित्त दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाल्याचे दिसून आले.या विजयी मेळाव्यासाठी पिंपरी चिंचवड मधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे  जिल्हाप्रमुख गौतम  चाबुकस्वार, शहर प्रमुख संजोग वाघेरे, महिला आघाडी शहर प्रमुख रूपाली आल्हाट, गुलाब गरुड, हरेश नखाते  युवराज कोकाटे सचिन जाधव अशोक कांबळे माधव मुळे रोमी संधू  आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.
 
मनसेच्या वतीने शहर प्रमुख सचिन चिखले बाळा दानवले रुपेश पटेकर सीमा बेलापूरकर राजू साळवे विशाल मानकरी नाथा शिंदे सुशांत साळवी सचिन मिरपगार  यांनी मेळाव्यासाठी उपस्थिती दर्शवली. शिवसेना उद्धव ठाकरे गटापेक्षा मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला ठाकरे बंधूंचे विजयी मेळाव्यासाठी मनसेच्या वतीने शहरातून एक बस तसेच १२ फोर व्हीलर मधून कार्यकर्ते वरळी मेळाव्यासाठी गेले होते.
 
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिंपरी चिंचवड मध्ये ही शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना काहीशी ऊर्जा मिळाली आहे. मात्र या वातावरण निर्मितीचा महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष किती फायदा घेतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles