ब्रिजेश सोलंकी याच्या मृत्यूला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार   

प्रियंका डोळस यांचा आरोप 

पिंपरी : उत्तम कबड्डी खेळाडू  असलेल्या ब्रिजेश सोलंकी याच्या मृत्यूला  उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असल्याचा आरोप प्राणी मित्र प्रियंका डोळस यांनी केला आहे.उत्तर प्रदेशच्या   फराना गावातील २२ वर्षीय कबड्डीपटू बृजेश सोलंकी याचा कुत्रा चावल्याने रेबिजच्या आजाराने मृत्यू झाला.  या घटनेबाबत प्रियंका डोळस यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने भटक्या प्राण्यांसाठी  काय उपाययोजना  राबवली? किती कुत्र्यांचे लसीकरण आणि स्टरलायझेशन झाले आहे? ब्रिजेशनच्या प्रकरणा  मधून  निदर्शनात येत आहे की अजूनही भटक्या कुत्र्यांचे लसीकरण झालेले नाही. कुत्र्याला लस  देणे अनिवार्य आहे . उत्तर प्रदेश सरकारने तेथील प्राणीप्रेमीची मदत घेऊन कुत्र्यांचा लसीकरण व नसबंदी करणे उचित ठरेल  भारतामध्ये अनेक ठिकाणी जागृती व   प्राण्यांची मदत आपण कशा प्रकारे करू शकतो अशा अनेक प्रक्रिया राबवण्यात याव्या. सरकारी हॉस्पिटलमध्ये  मोफत लसीकरण आहे २४ तासाच्या आत व पुढील डॉक्टरांनी सांगितलेल्या शेड्युल प्रमाणे लसीकरण घेणे अनिवार्य आहे. ब्रिजेश सोलंकेने लसीकरण घेणे टाळले. 

Related Articles