महापालिकेची डेंग्यू,मलेरिया निर्मूलनासाठी जनजागृती मोहीम   

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या सफाई अपनाओ, बिमारी भगाओ या स्वच्छता व आरोग्य जनजागृती मोहिमेचा शुभारंभ अटल बिहारी वाजपेयी उद्यान, पूर्णानगर येथे झाला. या उपक्रमांतर्गत डेंग्यू व मलेरियासारख्या साथीच्या आजारांपासून बचावासाठी स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणे तसेच या उपक्रमाच्या अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कीटकनाशक फवारणी, फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी तसेच हँड स्प्रे उपकरणांद्वारे घराघरात औषध फवारणी देखील करण्यात येत आहे. याप्रसंगी ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, सहायक आरोग्य अधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर, तसेच आरोग्य निरीक्षक महिंद्र साबळे, गौरव दराडे, समाधान कातड, रामचंद्र शिंगाडे, आरोग्य सहाय्यक राहुल ककरोटी, आरोग्य मुकादम अनिल कांबळे, कैलास मांढरे आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles