व्हॉट्सऍप कट्टा   

वारकरी, रखुमाई वर ...
 
एक पाऊल पडे पंढरीच्या वाटेवर 
दुजे अडकले सदनी ’मम’,    
उंबर्‍यावर द्विधा आंदोलनी, 
शरण मी त्या विटेवर...वारकरी ...
 
पांडुरंग कृपाळू वसलासे ध्यानीमनी
एकवटली तेजप्रभा जी देखिली स्वप्नी
अशी कशी सोडू मी ओढ,
वार्‍यावर?... वारकरी...
 
सासुमाय घरात दमली,    
भागलेली फार कुठे ती, 
चार घासांचीच भुकेली
’निभावीन’ म्हणे, 
माझा प्रेमळ शेजार... वारकरी...
 
माऊली सांगतो, आषाढ वारी
पार पडू दे दाटलेली खिचखिच 
भजनात विस्मरू दे
निर्मळ करील लाडे मजला,
चंद्रभागातीर... वारकरी....
 
टाळ चिपळ्या नादती घुमती| 
दिनरात कानी प्रपंच मज रोखितो, 
मागुती असा खेचुनी दृष्ट भेट 
होउ दे सावळ्या दे, 
गती वार्‍यावर...वारकरी...
 
तुळशी माळा रुळती विठ्ठला|  
गळाभर सदैव तुझेच बा श्रीरंगा ’कर’  
कटीवर सगुण रूप पाहू दे मजसी 
मनोहर... वारकरी...
 
अखेरी दुसरे पाऊल जाय पुढे
कांकणभर इच्छा सावळ्याची अवघे भाव
अधिअधीर लोचना भासे, 
हरेक वारकरी रखुमाई ’वर’!... वारकरी... 
 
- कविता मेहेंदळे मो. ९३२६६ ५७०२७
----------
संत रंग
 
मलिन माझ्या आत्म्यानं | एकदा असं करावं ॥
तव पदी लीन होताना | निर्मळ त्यानं व्हावं ॥ १ ॥
 
कलियुगी नाही कुणा | रीतभात बोलण्यास ॥
ज्ञानेश्वर होता यावं | ते बोल वदविण्यास ॥ २ ॥
 
दु:ख आणि वेदना या | सभोवती नांदतात ॥
दळण्यासाठी हवेत | ते जनाईचेच हात ॥ ३ ॥
 
तूच तो एक कैवारी | अनाथांचा तूच नाथ ॥
उद्धरण्या हीनदीन | व्हावी वृत्ती एकनाथ ॥ ४ ॥
 
माझ्या सदनी आहेच | रोज राबता सुखांचा ॥
भक्तीनेच फुललेला | जसा मळा सावताचा ॥ ५ ॥
 
निरागसता असावी | भक्तीत ती नाम्यापरी ॥
हट्ट पुरवाया माझा | यावा पंढरीचा हरी ॥ ६ ॥
 
मायबापाच्या सेवेचा | तो पुंडलिक सोहळा ॥
युगे अठ्ठावीस उभा | विटेवर तो सावळा ॥ ७ ॥
 
अनाठायी साठलेले | सकळ गे अवगुण ॥
तुडवावे पायी त्यांना | गोरोबा सम होऊन ॥ ८ ॥
 
अंती तुझा नामघोष | मुखी सतत असावा ॥
चोख्यापरी रे मिळावा | तव चरणी विसावा ॥ ९ ॥
 
सत्कर्माने पुण्याचीच | व्हावी इतुकी कमाई ॥
तुक्यापरी ती पालखी | यावी घेऊन विठाई ॥ १० ॥
- तनुजा चव्हाण
मो. : ९८६०७४२९९९
 
??
वारी
 
आषाढी वारीचा
भरला सोहळा
विठूरायांच्या पालखीचा
चैतन्याचा ...
मांगल्याचा...
विठ्ठल.... विठ्ठल...
माझा विठ्ठल...
पांडुरंग विठ्ठल...
तुझ्या भेटीची आस
तूच आहेस
माझ्या आसपास
तुझा ध्यास...
विठू माझा भिनला
नसानसात...
मना...मनात...
माझ्या व्यथा वेदनेचा
तू साक्षीदार...
तुझा जप
करता.... करता...
दु:खावर करतो
मी मात
असू दे तुझी
मला साथ ...
 
- राहुल भोसले, पुणे
मो. ९८९०४६१८८६
--------

Related Articles