आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने डॉ.माने पाटील यांचा सन्मान   

लोहगाव: आंतरराष्ट्रीय खेळाडू व सामर्थ्य जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.स्वप्निल माने पाटील यांनी गेल्या पंधरा वर्षात सामजिक क्षेत्रात केलेल्या कार्या बद्दल राष्ट्रभक्ती संस्थेच्या वतीने आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राष्ट्रभक्ती सन्मान सोहळ्याचे संयोजक सुनिल गोरे यांच्यासह सर्व पदाधिकार्‍यांनी केले. यंदाही राष्ट्रभक्ती संस्थेच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तेव्हा डॉ. स्वप्निल माने पाटील यांचा ही सन्मान केला.   
 
भाजपाचे वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब हरपळे, एमआयटीचे महेश थोरवे, स्वराज्य महाविद्यालयाचे संचालक गोपाल खंडारे,मंडई विद्यापीठ कट्टाचे सुधीरक गाडेकर, राष्ट्रवादी पक्षाच्या भारती तुपे  यांच्या हस्ते डॉ.माने पाटील यांना हा पुरस्कर देण्यात आला.डॉ.माने पाटील म्हणाले,  समाजाप्रती कार्य करत असताना पुरस्कार व सन्मानाचा आनंद आहे.परंतू सन्मानानी मोठी जबाबदारी पण वाढत आहे.शिवाय भविष्यात समाज हिताच्या दृष्टीने आणखी प्रभावी पणे कार्य करण्यास ऊर्जा मिळाली. हा पुरस्कार  माझा एकट्याचा नसून सामर्थ्या संघटनेतील सर्व पदाधिकार्‍यांचा आहे.या प्रसंगी श्रध्दा गोरक्ष (आप्पा) परांडे,  लेशपाल जवळगे यांच्या कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित  होते.

Related Articles