पुण्याला वैद्यकीय पर्यटन केंद्र बनवावे: आमदार सिद्धार्थ शिरोळे   

पुणे: जगभरातून अनेक लोक उपचारासाठी पुण्यात येणे पसंत करतात हे लक्षात घेऊन पुण्याला वैद्यकीय पर्यटन केंद्र घोषित करावे, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी नुकतीच विधानसभेत बोलताना केली. सध्या आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियातील अनेक लोक उपचारासाठी भारतात येतात आणि विशेषतः पुण्यात उपचारासाठी येणार्‍या लोकांची संख्या जास्त आहे. याद्वारे सर्व रुग्णालये, वेलनेस सेंटर आणि डायग्नोस्टिक सेंटर एकत्र आणावेत, असे आमदार शिरोळे यांनी आपल्या भाषणात सांगितले. ते म्हणाले, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात इंद्रायणी मेडिसिटी उभारण्यात येत आहे. रुग्णालयांसोबतच त्यात एकाच कक्षेत निदान आणि संशोधन केंद्रांचाही समावेश असेल. इंद्रायणी मेडिसिटीचे बांधकाम लवकरच पूर्ण व्हावे. 

Related Articles