मणिपूरमध्ये शस्त्रास्त्रे जप्त   

इम्फाळ : मणिपूरच्या चार डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राबविलेल्या शोधमोहिमेत सुरक्षा दलांनी २०० हून अधिक शस्त्रे जप्त केली. त्यामध्ये बंदुका आणि युद्धाशी संबंधित साहित्य आहे. तेंग्नौपाल, कांगपोक्पी, चंदेल आणि चुराचंदपूर जिल्ह्यांच्या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि इतर युद्ध साहित्य लपवल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक लाहरी दोरजी लहाटू यांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंत  सुरक्षा दलाकडून संयुक्त मोहीम राबविण्यात आली. संयुक्त कारवाईत जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये २१ इन्सास रायफल्स, ११ एके सीरिज, २६ एसएलआर, नऊ पिस्तूल १०९ दारूगोळे यांचा समावेश आहे.  

Related Articles