अमेरिकेसोबतचा व्यापार करार बुधवारपूर्वी होईल   

नवी दिल्ली : अमेरिकेसोबतचा हंगामी व्यापार करार बुधवारपूर्वी होईल, असे अमेरिकेतून परतलेल्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सांगितले. चर्चेत विविध विषयांवर चर्चा शिष्टमंडळाने केली आहे मात्र, कृषी आणि वाहन क्षेत्रासंदर्भातील मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत. ९ जुलैपर्यंत वाटाघाटी सुरूच राहणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार करार करण्यासाठी ९ जुर्लैपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत तो झाला नाही. नंतर प्रत्युत्तर शुल्क लावले जाईल, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारतीय प्रतिनिर्धींंचे शिष्टमंडळ अमेरिकेत गेले होते. तेथे हंगामी व्यापार करार करण्यावर त्यांनी वाटाघाटी केल्या. पण, कृषी आणि वाहन विषयक क्षेत्रातील प्रश्न सुटले नसल्याचे सांगण्यात आले.

Related Articles