राज्यातील कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक   

मुंबई : राज्यात तब्बल १ लाख ८२ हजार ४४३ बालके कुपोषित असून, सर्वाधिक कुपोषित बालकांची संख्या मुंबई उपनगरात असल्याची माहिती   सरकारने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.राज्यामध्ये मध्यम कुपोषित बालकांची संख्या १ लाख ५१ हजार ६४३ तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या ३० हजार ८०० एवढी आहे. मुंबई उपनगरमध्ये १६ हजार ३४४ कुपोषित बालके असून, यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या १३ हजार ४५७ तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या २ हजार ८८७ आहे. नाशिकमध्ये ९ हजार ८५२ कुपोषित बालकांची संख्या यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या ८ हजार ९४४ तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या १ हजार ८५२ आहे.
 
ठाणे जिल्ह्यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या ७ हजार ३६६ तर तीव्र कुपोषित बालकांची ८ हजार ४४ आहे. पुण्यात मध्यम कुपोषित बालके ७ हजार ४१० तर तीव्र कुपोषित १ हजार ६६६ बालके आहेत. धुळे जिल्ह्यात मध्यम कुपोषित बालके ६ हजार ३७७ तर तीव्र कुपोषित बालके १ हजार ७४१ आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम कुपोषित बालके ६ हजार ४८७ तर तीव्र कुपोषित बालके १ हजार ४३९ आहेत. नागपूर मध्यम कुपोषित बालके ६ हजार ७१५ तर तीव्र कुपोषित बालके १ हजार ३७३ आहेत. यावरून कुपोषण कमी करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजना आणि होणारा खर्च यावरून मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Related Articles