पुणे : सत्य आरंभ संस्था पुणे, पद्मश्री शंकर बापू आपेगावकर ट्रस्ट, निर्मिती मीडिया सोल्युशन आणि आदित्यराजे मराठे प्रोडक्शन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने हडपसर येथे आयोजित केलेल्या कला महर्षी चित्र सूर्य कै. बाबुराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये नॅशनल ह्युमन राईट्स कमिशियन इंडिया चे सभासद अमित अदमाने तसेच सत्य शिव शंभू मराठा स्वराज्य प्रतिष्ठानचे अमित अदमाने यांना आजपर्यंत केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक वैद्यकिय क्षेत्रातील कार्याची दखल घेता, जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना अमित अदमाने म्हणाले, संस्थेतर्फे मी करता असलेल्या कार्याची दखल घेतली. माझा सन्मान केला. या सन्मानाने नेहमीच चांगले काम करण्यासाठी पाठबळ मिळते. नेहमीच समाजहिताचे काम माझ्याकडून होईल असा विश्वास अमित यांनी व्यक्त केला.
Fans
Followers