महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात   

पुणे : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७२ वा वर्धापनदिन नुकताच राज्यातील विविध कामगार कल्याण केंद्रात उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य कार्यक्रम कामगार क्रीडा भवन प्रभादेवी मुंबई येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी दीपप्रज्वलनाने सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरूवात झाली.
 
इळवे म्हणाले, यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेत कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच मंडळाने अलीकडच्या काळात सुरू केलेल्या आर्चरी, रायफल शुटिंग या उपक्रमांसह अद्यावत अभ्यासिका, व्यायामशाळा, टेबल टेनिस, जलतरण तलाव आदी सुविधांचा कामगार व त्यांचे कुटुंबियांना मोठा लाभ होईल. मंडळाच्या वाटचालीत शासन, लोकप्रतिनिधी, कामगार संघटना, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिकांचे योगदान मोलाचे आहे. असेही इळवे यांनी नमूद केले.
 
वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कामगार मंत्री आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. जागतिक मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, मधुकर खामकर, विसुभाऊ बापट, सत्यवान धुरी,सुरेखा काटकर, कमलाकर पाटील, रवींद्र पारकर, राम काजरोळकर, प्रकाश बाडकर, डॉ. अमित डोंगरे, दिलीप खोंड, बजरंग चव्हाण, विश्वजीत शिंदे, अजित शिंदे, परेश मुरकर आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. उपकल्याण आयुक्त महेंद्र तायडे, माधवी सुर्वे, नंदलाल राठोड, लेखा परीक्षा अधिकारी रवी टशेम्पे, सहाय्यक कल्याण आयुक्त डॉ. घनश्याम कुळमेथे, विधि अधिकारी जितेंद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी मनोज बागले, आदी अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते. 

Related Articles