पुण्यात पावसाची विश्रांती   

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात सातत्याने पाऊस पडत आहे. मात्र, शुक्रवारी शहरात पावसाने विश्रांती घेतली. जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शहरात पुढील चार दिवस ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला. 
 
शहर आणि उपनगरात काल सकाळपासून ढगाळ वातावरण कायम होते. त्यानंतर मात्र ऊन पडले होते. दुपारनंतर पुन्हा ढगाळ वातावरण होते. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मागील दोन दिवसांच्या तुलनेत काल सकाळी तसेच सायंकाळच्या वेळेत रस्त्यांवर वाहतूक कोंडी कमी झाल्याचे चित्र आहे. रात्री उशीरापर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. पावसाने उघडीप दिल्यामुळे विविध बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत होते. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे कमाल आणि किमान तपमानात फार मोठा बदल होणार नसल्याचेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
दरम्यान, समुद्रसपाटीवरील एक द्रोणीय रेषा महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत  स्थित आहे. मागील २४ तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी खूप जोरदार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस, कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. घाट विभागात पावसाचे सातत्य कायम आहे. 
 
धरण क्षेत्रातील पाऊस
 
धरण                   पाऊस टीएमसी      टक्केवारी 
खडकवासला      ०१ मिमी        १.१५          ५८.१६
पानशेत             ०६ मिमी        ६.१९          ५८.१४
वरसगाव           ०६ मिमी ८.२५          ६४.३२
टेमघर              १६ मिमी         १.७८           ४८.४ 
एकूण              २९ मिमी        १७.३७         ५९.५८

Related Articles