दुसर्‍या कसोटीत रवींद्र जडेजाने मोडला बीसीसीआयचा नियम   

बर्मिंगहॅम  : भारताच्या इंग्लंडविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यातील विक्रमी पुनरागमनात रवींद्र जडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने कर्णधार शुबमन गिलबरोबर २०३ धावांची भागीदारी रचली. जडेजाने स्वतः ८९ धावांची खेळी करत माघारी परतला. अवघ्या काही धावांसाठी जडेजाचं शतक हुकलं. पण जडेजाने दुसर्‍या दिवसाचा खेळ सुरू होताच बीसीसीआयच्या नव्या नियमाचं उल्लंघन केलं. पण जडेजाने कोणता नियम तोडला आणि यामागचं कारण काय होतं, याचा खुलासा त्याने स्वत: केला आहे.
 
भारताच्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध दौर्‍यानंतर संघामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. कसोटी क्रिकेट आणि भविष्याचा विचार करता अनेक नवे नियम, खेळाडूंमध्ये बदल पाहायला मिळाले. या दौर्‍यानंतरच भारताच्या दिग्गज खेळाडूंनी म्हणजेच विराट कोहली, रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलिया दौर्‍यामध्ये भारताला ३-१ असा पराभव पत्करावा लागला होता. ऑस्ट्रेलिया दौर्‍यानंतर, बीसीसीआयने एक नवीन नियमावली तयारी केली होती. त्यानुसार सर्व खेळाडूंना टीम बसमध्ये एकत्र स्टेडियममध्ये येण्याजाण्याबाबत पण नियम आहे. परंतु एजबॅस्टन कसोटीच्या दुसर्‍या दिवशी, जडेजा टीम बसमध्ये आला नाही, तो त्या आधीच तिथे पोहोचला होता. इंग्लंडमधील आव्हानात्मक खेळपट्ट्यांसाठी आवश्यक तयारी म्हणून तो लवकर पोहोचला होता. पण हा नियम तोडण्यासाठी जडेजाला शिक्षा होणार नसल्याचही म्हटलं जात आहे.

Related Articles