ठाकरे बंधूच्या विजयी मेळाव्याची तयारी   

मुंबई : उद्धव आणि राज ठाकरे बंधूचा विजयी मेळावा आज (शनिवारी) वरळी डोम येथे होणार आहे. या  मेळाव्याचा टीझर प्रसिद्ध झाला आहे.  त्याची तयारी वेगाने सुरू आहे. या माध्यमातून दोघेही बंधू आणि कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
 
विजयी मेळाव्याच्या टीझरमध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. राज्याच्या राजकारणात ठाकरे कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा टीझर आहे. मराठीच्या पाठीत वार करायचा पुन्हा प्रयत्न झाला. तेव्हाही महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात ठाकरे उभे राहिले आणि जिंकले. आता ठाकरे बंधूनी पुन्हा हाक दिली आहे. महाराष्ट्राला विजयोत्सवासोबत मराठी असे या टीझरमध्ये म्हटले आहे. या वाक्यातून महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा आणि ठाकरे यांच्या नेतृत्वाची आठवण करून दिली जात आहे. मेळाव्याबाबत  राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Related Articles