नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचे आरोप विचित्र   

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचे आरोप विचित्र आहेत, असे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या संदर्भात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीत शुक्रवारी सांगितले.
 
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने खटला दाखल केला आहे. त्याची सुनावणी काल झाली. तेव्हा बाजू मांडताना संघवी यांनी ईडीला लक्ष्य केले. सोनिया गांधी यांच्यावर ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त महाअधिवक्ता एस. व्ही. राजू यानी ईडीच्या बाजूने काल बाजू मांडली. त्यावर संघवी यांनी दावा केला की, ईडीने दाखल केलेले आरोपपत्र विचित्र आणि अनपेक्षित आहे. आर्थिक अफरातफरीचे आरोप असून त्यात मालमत्ता किंवा तिचा वापर यांचा समावेश नाही. सोनिया, राहुल गांधी तसेच मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पॅत्रोदा यांना आरोपी केले आहे.  खासगी कंपनी यंग इंडियन यानी कारस्थान रचून आर्थिक अफरातफर केली, असे आरोप केले आहेत. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकाशित करणार्‍या असोसिएट्स जर्नल लिमिटेडची दोन हजार कोटींची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी सर्वानी गैरव्यवहार केल्याचे म्हटले आहे. 

Related Articles