पंतप्रधान मोदी यांना घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार   

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान ’द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ने सन्मानित करण्यात आले आहे. या दौर्‍यात दोन्ही देशांमध्ये चार वेगवेगळ्या सामंजस्य करारांवर (युएन) स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत. भारत आणि घाना मिळून मानवतेचा शत्रू असलेल्या दहशतवादाविरोधात एकत्र काम करतील, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

ही वेळ युद्धाची नाही चर्चेची 

सर्वोच्च सन्मानानंतर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, घानाकडून सन्मानित होणे, ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. भारत आणि घाना दहशतवादाला मानवतेचा शत्रू मानतात आणि त्याविरोधात एकत्रितपणे लढा देतील. ही युद्धाची वेळ नसून, चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून समस्या सोडवल्या पाहिजेत. तत्पूर्वी, त्यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांच्यासोबत संयुक्त निवेदन जारी केले. दोन्ही देशांत संयुक्त राष्ट्रांमध्ये (युएन) सुधारणा करण्यावर एकमत आहे. त्याचबरोबर, पश्चिम आशिया आणि युरोपमधील सुरू असलेल्या संघर्षांवर दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली.

२५ हजार कोटींचा व्यापार करार

भारत आणि घाना यांच्यात व्यापार २५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला असून, पुढील पाच वर्षांत तो दुप्पट करण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. घानाचे अध्यक्ष जॉन महामा यांना मोदी यांनी भारत भेटीचे निमंत्रणही दिले.
 
भारत घानाला फिनटेक क्षेत्रात सहकार्य करेल आणि युपीआय (UP) डिजिटल व्यवहारांचा अनुभव सामायिक करेल. भारत घानाच्या तरुणांसाठी आयटीइसी आणि आयसीसीआर शिष्यवृत्तींची संख्या दुप्पट करणार आहे. 
 

Related Articles