अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा दुसरा जथा रवाना   

श्रीनगर : अमरनाथ यात्रेसाठी गुवारी जम्मू बेस कॅम्पमधून ५ हजार २०० हून अधिक यात्रेकरूंचा दुसरा जथा रवाना झाला. दक्षिण काश्मीरमध्ये ३ हजार ८८० मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेच्या मंदिराची ३८ दिवसांची यात्रा गुरुवारी पहाटे खोर्‍यातून दोन मार्गांनी सुरू झाली. अनंतनाग जिल्ह्यातील पारंपरिक ४८ किलोमीटर लांबीचा नुनवान-पहलगाम मार्ग आणि गंदरबल जिल्ह्यातील १४ किलोमीटर पण जास्त उंचीचा बालताल मार्ग. ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी संपेल.
 
पोलिस आणि केंद्रीय निमलष्करी दलांच्या सुरक्षेत १६८ वाहनांच्या ताफ्यात यात्रेकरू भगवती नगर बेस कॅम्पमधून निघाले. जम्मू बेस कॅम्पमधून मंदिराकडे जाणार्‍या यात्रेकरूंची संख्या आता ११ हजार १३८ झाली आहे. यात्रेकरूंच्या दुसर्‍या तुकडीत ४ हजार ७४ पुरुष, ७८६ महिला आणि १९ मुले होती. 
 
यात्रेकरूंच्या गटात सहभागी असलेले रायपूरचे रहिवासी हरीश कुमार म्हणाले, आम्हाला दहशतवाद्यांची किंवा पाकिस्तानची भीती वाटत नाही, ज्यांनी निष्पाप आणि निःशस्त्र पर्यटकांवर हल्ले केले आहेत. हे भ्याडपणाचे कृत्य आहे. पहलगामसारख्या दहशतवादी घटनांद्वारे भीती निर्माण करून ते आम्हाला बाबा बर्फानीला भेट देण्यापासून रोखू शकत नाहीत. 
 

Related Articles