कर्करोग निदान व्हॅन खरेदीत गैरव्यहार   

भास्कर जाधव यांचा आरोप

मुंबई, (प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्य विभागाने कर्करोग निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन  बाजारभावापेक्षा दुप्पट-तिप्पट  जादा दराने खरेदी केली.  ४५ ते ५० लाखांची एक व्हॅन ९९ लाखांना खरेदी करण्यात आली असून यात गैरव्यवहार झाला असल्याचा  आरोप शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते   भास्कर जाधव यांनी गुरुवारी  विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात  केला. या आरोपानंतर हे अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला  दिले. कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन खरेदीबाबत जाधव यांनी काल तारांकित प्रश्न विचारला होता.  व्हॅनची मूळ किंमत त्यावरील फॅब्रिकेशन, उपकरणे असा एका व्हॅनचा खर्च ४५ ते ५० लाख अपेक्षित असताना पुरवठादार कंपनीबरोबर संगनमत करून वाहन खरेदी करताना सर्व नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे काय? असा प्रश्न भास्कर जाधव यांनी केला. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार या चर्चेत भाग घेताना, एका व्हॅनची किंमत ४० लाखांपेक्षा अधिक होऊ शकत नाही. या व्हॅनमधील यंत्र १२ लाखांपेक्षा अधिक नाही.  वाहने खरेदी करताना अधिकच्या किंमतीने घेण्यात आली.  या व्हॅनमधील काही यंत्रे बंद आहेत.  

Related Articles