विधानसभेची कामकाज पत्रिका इंग्रजीत   

मुनगंटीवार यांचा संताप

मुंबई, (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी  गुरुवारी विधानसभेत इंग्रजी भाषेच्या मुद्द्यवरून सरकारला घरचा आहेर दिला. मी १९९५ पासून विधानसभेत आहे. पण, कधी इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका बघितली नव्हती. आता पहिल्यांदाच मला इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका मिळाली. इंग्रजीला हे अलिंगन का? असा सवाल करत विधानसभा अध्यक्षांनी नियम समितीची बैठक घेऊन इंग्रजी शब्दच काढून टाकावे, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.
 
पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विषयावरून सरकारने माघार घेतली असली तरी मराठी प्राधान्याचा मुद्दा सध्या चर्चेत असताना काल विधानसभेत काही सदस्यांना इंग्रजीतून कार्यक्रमपत्रिका मिळाली. त्यावरून मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली. 

Related Articles