श्रमयोगी मानधन योजनेतून वृद्धांना तीन हजार रुपये   

वृत्तवेध 

देशातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने वेळोवेळी अनेक योजना राबवल्या आहेत. अशा योजनांचा उद्देश लोकांना जास्तीत जास्त लाभ देऊन त्यांना बळकट करणे. अशा योजनांपैकी एक म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना. ६० वर्षांवरील सर्व वृद्ध या योजनेसाठी पात्र आहेत. त्याद्वारे त्यांना दरमहा तीन हजार रुपये दिले जातात.
 
केंद्रातील मोदी सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना लाभ दिला जातो. १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान वय असलेल्या लोकांनाही प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेता येतो. यासोबतच असंघटित क्षेत्रातील मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो. या योजना कामगार आणि रोजगार मंत्रालय चालवत आहे. वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये देणार्‍या या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्‍याला त्याच्या वयानुसार योगदान द्यावे लागेल.
 
यासोबतच केंद्र सरकार अशा योजनाधारकांना योगदानदेखील देते. या योजनेत दरमहा एक हजार रुपये जमा केल्यास केंद्र सरकारदेखील दरमहा एक हजार रुपये जमा करेल. अशा परिस्थितीत, दरमहा तुमच्या नावावर दोन हजार रुपये जमा होतील. या योजनेचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे विशिष्ट वय पूर्ण होते, तेव्हा तीन हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळणे त्या वृद्धाला मोठा दिलासा देणारी बाब ठरते.
 

Related Articles