जांभोरी-तळेघर रस्ता मुसळधार पावसाने खचला   

मंचर, (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी भागातील जांभोरी-तळेघर रस्ता मुसळधार पावसाने खचल्याने सोमवारी वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावर खड्डा पडल्याने अपघाताची शक्यता वाढल्याने जिल्हा परिषद विभागाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी माजी सरपंच संजय केंगले आणि ग्रामस्थांनी केली.
 
जांभोरी-तळेघर या ठिकाणी मुसळधार पावसाने रस्ता खचला आहे. रस्त्याच्या कडेला तडा गेला असून मध्यभागी खड्डा पडला आहे. त्यामुळे मोठ्या गाड्यांची वाहतूक बंद झाली आहे. दुचाकी चालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहे. जिल्हा परिषद विभागाच्या अधिकार्‍यांनी तात्काळ रस्ता दुरुस्त करुन द्यावा. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती केंगले यांनी दिला. रस्त्यावर वर्दळ असल्याने तातडीने रस्ता दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 

Related Articles