छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवर शिकवला जाणार   

नाशिक : राज्यात शालेय शिक्षणात मराठी भाषा अनिवार्य करण्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभर शिकवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. 
    
भुसे म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीत मराठी भाषेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे मराठीच्या अभिजात दर्जाला आणखी बळकटी मिळणार आहे. मराठी आपली मातृभाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. ही अभिमानाची बाब आहे. सर्व मराठी शाळांमध्ये मराठी शिकवणे अनिवार्य आहे. सीबीएससी माध्यमाच्या शाळांमध्ये देशापातळीवर त्या-त्या राज्याच्या भाषा शिकवणे बंधनकारक केले आहे.
    
केंद्र सरकारने १० तासिका मातृभाषेसाठी केल्या असताना आपल्या राज्याने १५ तासिका दिल्या आहेत. मराठीला जास्त वेळ दिला आहे. इंग्रजी भाषा काही वर्षांपासून स्वीकारली आहे. ती काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शिक्षक दिले जाणार आहेत. २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असेल तर ई-शिक्षण दिले जाईल. कोणतीही भाषा बंधनकारक नाही.दरम्यान, सध्या महाराष्ट्रात हिंदी भाषा वाद सुरू आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवण्याचा सरकारचा निर्णय आहे. या पार्श्वभूमीवर ५ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येत मोर्चा काढणार आहेत.

Related Articles