दहशतवादी साकीब नाचन याचा मृत्यू   

मुंबई : दहशतवादी आणि ‘सिमी’ या संघटनेचा माजी पदाधिकारी साकीब नाचन याचा शनिवारी दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यू झाला. ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाला, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील रहिवासी असलेला साकीब याला चार दिवसांपूर्वी दिल्लीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असेही ते म्हणाले. २०२३ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने साकीबच्या घरावर छापे घातले होते. तसेच, साकीबसह अन्य काही जणांना अटक केली होती. तेव्हापासून तो दिल्लीतील तिहार तुरुंगात बंद होता.
 
मंगळवारी अचानक त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी  ब्रेन हॅमरेजची पुष्टी केली.काल त्याची प्रकृती अधिकच बिघडली आणि दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. उत्तरीय वैद्यकीय तपासणीनंतर त्याचे पार्थिव कुटुंबीयांकडे सोपविले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Related Articles