E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल
Wrutuja pandharpure
29 Jun 2025
नवी दिल्ली
: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं पुरुष क्रिकेटमधील ६ नियम बदलले आहेत. यामुळं क्रिकेट अधिक वेगवान, निष्पक्ष आणि रोमांचक होण्यात मदत होणार आहे. कसोटी क्रिकेटमधील नियम २०२५-२७ या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपासून लागू केले जाणार आहेत. एकदिवसीय क्रिकेट आणि टी २० क्रिकेटमधील नियम २ जुलै २०२५ पासून लागू करण्यात आलेले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम : आयसीसीनं कसोटी क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार कसोटी क्रिकेटमध्ये फील्डिंग करणार्या टीमनं ६० सेकंदापेक्षा जास्त वेळ ओव्हर सुरु करण्यास लावल्यास पहिल्यांदा दोन वेळा वॉर्निंग दिली जाणार आहे. त्यानंतर नियमाचा भंग केल्यास त्या संघाच्या ५ धावा वजा केल्या जाणार आहेत. टी २० क्रिकेट आणि वनडे क्रिकेटमध्ये नियम एक वर्षापूर्वीपासून लागू केलेला आहे. आयसीसीनं कसोटी, वनडे आणि टी २० क्रिकेटमधील शॉर्ट रनचा नियम बदलला आहे. जाणीवपूर्वक शॉर्ट रन घेतल्यास पहिल्यांदा ५ धावांचा दंड लावला जायचा. आता फलंदाजानं अतिरिक्त रन घेण्यासाठी जाणीवपूर्वक पहिली रन पूर्ण न केल्यास अम्पायर फील्डिंग करणार्या संघाला स्ट्राइकवर कोणता खेळाडू पाहिजे असं विचारतील. ५ धावांचा नियम देखील लागू असेल.
एखाद्या गोलंदाजानं बॉलवर सलाइवा (लाळ) लावल्यास बंदी कायम राहील. चुकून सलाइवा लावल्यास बॉल बदलनं अनिवार्य नसेल. बॉलच्या रचनेत बदल झाल्यास किंवा बॉल खूप ओला झाल्यानं त्याच्यावरील चमक वाढल्यास अम्पायर बॉल बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात. बॉल बदलण्याचा निर्णय घेणं हे पंचांच्या विवेकावर अवलंबून असेल. बॉलमध्ये फार बदल झाला नसेल तर तर तो बदलला जाणार नाही. हे नियम कसोटी, वनडे आणि टी २० क्रिकेटसाठी लागू असतील.आयसीसीनं कॅचच्या नियमात देखील बदल केले आहेत. जर कॅच आऊटच्या रिव्यूमध्ये तो चुकीचा ठरल्यास आणि बॉल पॅडवर लागल्यास टीव्ही अम्पायर एलीबीडब्ल्यू फलंदाज आऊट आहे का ते पाहतील. हा नियम कसोटी, टी २० आणि वनडे मध्ये लागू असेल. पंचांनी सॉफ्ट सिग्नल रिव्यू घेतल्यास आणि नो बॉलवर कॅच योग्य असल्यास फलंदाजी करणार्या टीमला नो बॉलची एक रन अतिरिक्त मिळेल. कॅच योग्य नसल्यास नो बॉलची एक रन आणि फलंदाज जितक्या रन धावतील त्यांना त्या धावा मिळतील.
पहिल्यांदा कॅचसंदर्भात संशय असल्यास मैदानावरील पंच थंर्ड अम्पायरकडे दाद मागायचे. त्यावेळी टीव्ही अम्पायर नो बॉल होता की नव्हता हे सांगायचे, कॅचची तपासणी करत नव्हते. आता त्याची तपासणी केली जाईल. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये हा नियम लागू असेल.आयसीसीनं टी २० क्रिकेटमधील पॉवरप्लेच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हे नियम जुलैपासून लागू होणार आहेत. पाऊस किंवा अन्य कारणांमुळं मॅचमधील ओव्हर कमी केल्यास पॉवरप्लेच्या ओव्हर देखील कमी केल्या जाणार आहे.आयसीसीनं गेल्या काही दिवसांपूर्वी वनडे क्रिकेटमध्ये ३५ ओव्हरनंतर बॉल बदलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळं डेथ ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. तर बाऊंड्रीवर कॅच घेण्यासंदर्भातील नियम देखील आयसीसीनं बदलले आहेत.
Related
Articles
गुन्हेगारी हद्दपार करणार
25 Jul 2025
चहाची निर्यात वाढली
20 Jul 2025
इस्लामपूर आता होणार ईश्वरपूर!
19 Jul 2025
प्रसिद्ध कृष्णाऐवजी अंशुल कंबोजला पहिली पसंती
23 Jul 2025
’पीएमपी’च्या पर्यटन बससेवेला प्रतिसाद
20 Jul 2025
कर्नाटकात नवीन जातनिहाय जनगणना २२ सप्टेंबरपासून
24 Jul 2025
गुन्हेगारी हद्दपार करणार
25 Jul 2025
चहाची निर्यात वाढली
20 Jul 2025
इस्लामपूर आता होणार ईश्वरपूर!
19 Jul 2025
प्रसिद्ध कृष्णाऐवजी अंशुल कंबोजला पहिली पसंती
23 Jul 2025
’पीएमपी’च्या पर्यटन बससेवेला प्रतिसाद
20 Jul 2025
कर्नाटकात नवीन जातनिहाय जनगणना २२ सप्टेंबरपासून
24 Jul 2025
गुन्हेगारी हद्दपार करणार
25 Jul 2025
चहाची निर्यात वाढली
20 Jul 2025
इस्लामपूर आता होणार ईश्वरपूर!
19 Jul 2025
प्रसिद्ध कृष्णाऐवजी अंशुल कंबोजला पहिली पसंती
23 Jul 2025
’पीएमपी’च्या पर्यटन बससेवेला प्रतिसाद
20 Jul 2025
कर्नाटकात नवीन जातनिहाय जनगणना २२ सप्टेंबरपासून
24 Jul 2025
गुन्हेगारी हद्दपार करणार
25 Jul 2025
चहाची निर्यात वाढली
20 Jul 2025
इस्लामपूर आता होणार ईश्वरपूर!
19 Jul 2025
प्रसिद्ध कृष्णाऐवजी अंशुल कंबोजला पहिली पसंती
23 Jul 2025
’पीएमपी’च्या पर्यटन बससेवेला प्रतिसाद
20 Jul 2025
कर्नाटकात नवीन जातनिहाय जनगणना २२ सप्टेंबरपासून
24 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)