E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
जोश हेजलवूडच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा बलाढ्य विजय
Wrutuja pandharpure
29 Jun 2025
बार्बाडोस
: पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध दौर्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात ही धमाकेदार विजयासह केली. दुसर्या डावात ३१० धावा करून ऑस्ट्रेलियन संघाने यजमान वेस्ट इंडिज संघासमोर ३०१ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १४१ धावांत ऑल आउट झाला. कहर म्हणजे दुसर्या डावात वेस्टइंडिजचा संघाने एका सत्रात सर्वच्या सर्व १० विकेट्स गमावल्या. जोश हेजलवूडच्या भेदक मार्यासमोर कॅरेबियन बॅटर्संनी अक्षरश: नांगी टाकली.बार्बाडोसमधील ब्रिजटाउन येथील केन्सिंग्टन ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात जोश हेजलवूडनं अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाच विकेट्सचा डाव साधला. कसोटी कारकिर्दीत १३ व्या वेळी त्याने हा पराक्रम करून दाखवलाय. त्याच्याशिवाय अखेरच्या षटकात लायन याने २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.
ऑस्ट्रेलियन संघाने ८२ धावांच्या आघाडीसह तिसर्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती. ट्रॅविस हेड, ब्यू वेबस्टर आणि एलेक्स कॅरी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने दुसर्या डावात ३१० धावा करत वस्ट इंडिजच्या संघासमोर ३०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पहिल्या दोन दिवसातील खेळात २४ विकेट्स पडल्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघासमोर ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान सहाजिकच मोठे होते. यजमान संघाने धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. धावफलकावर १ बाद ४७ अशी धावसंख्या असताना कॅरेबियन संग कांगारुंना टक्कर देईल, असे चित्र निर्माण झाले होते. पण हे चित्र क्षणात पालटलं. वेस्ट इंडिजच्या संघाने ९ धावांत ४ विकेट्स गमावल्या अन् सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं फिरला.
अवघ्या ५६ धावांवर वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परतला होता. ठराविक अंतराने विकेट गमावत शंभरीच्या आत संघाने ८ विकेट्स गमावल्या. लायननं अखेरच्या षटकात दोन विकेट्स घेतल्या अन् एका सत्रात १० विकेट्स देत वेस्ट इंडिजच्या संघावर लाजिरवाण्या पराभवाची नामुष्की ओढावली. गत वर्षी गाबाच्या मैदानात वेस्ट इंडिजच्या संघाने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानात शह दिला होता.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
धाडसी क्रांतीकारी महिला - दुर्गादेवी वोहरा
25 Jul 2025
कुसगाव ग्रामस्थांचे खंबाटकी बोगद्यात आंदोलन
21 Jul 2025
भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात
25 Jul 2025
उपराष्ट्रपती कोण? थरूर की नितीश
23 Jul 2025
केंद्र सरकारकडून दोन रेल्वेमार्गांना मंजुरी
20 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
धाडसी क्रांतीकारी महिला - दुर्गादेवी वोहरा
25 Jul 2025
कुसगाव ग्रामस्थांचे खंबाटकी बोगद्यात आंदोलन
21 Jul 2025
भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात
25 Jul 2025
उपराष्ट्रपती कोण? थरूर की नितीश
23 Jul 2025
केंद्र सरकारकडून दोन रेल्वेमार्गांना मंजुरी
20 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
धाडसी क्रांतीकारी महिला - दुर्गादेवी वोहरा
25 Jul 2025
कुसगाव ग्रामस्थांचे खंबाटकी बोगद्यात आंदोलन
21 Jul 2025
भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात
25 Jul 2025
उपराष्ट्रपती कोण? थरूर की नितीश
23 Jul 2025
केंद्र सरकारकडून दोन रेल्वेमार्गांना मंजुरी
20 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
धाडसी क्रांतीकारी महिला - दुर्गादेवी वोहरा
25 Jul 2025
कुसगाव ग्रामस्थांचे खंबाटकी बोगद्यात आंदोलन
21 Jul 2025
भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात
25 Jul 2025
उपराष्ट्रपती कोण? थरूर की नितीश
23 Jul 2025
केंद्र सरकारकडून दोन रेल्वेमार्गांना मंजुरी
20 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
टीआरएफ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना