E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अनधिकृत व्यावसायिकांसह अतिक्रमणाविरोधात कारवाई
Wrutuja pandharpure
27 Jun 2025
पुणे
: येरवडा, कळस, धानोरी क्षेत्रिय कार्यालयासह हडपसर, मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये असणारे अतिक्रमण व अनधिकृत व्यावसायिकांवर पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम विभागाने गुरुवारी मोठी कारवाई केली. यावेळी गैर प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जेसीबीच्या साहयाने बांधकामांचे शेड पाडण्यात आले. तर अनेक विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. ही अतिक्रमण कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे यांनी दिली.
येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील म्हस्के वस्ती ते फुलेनगर व विश्रांतवाडी ते फाईव नाईन चौक येथील रस्ता पदपथावरील तसेच फ्रंट व साईड मार्जिनमध्ये अनेकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे काही मार्गावर वाहतुककोंडी होत होती. तर येणार्या जाणार्यांना देखील या अतिक्रमणांचा त्रास होत होता. त्यामुळे ही अतिक्रमणे काढण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. आयुक्त नवल किशोर राम यांनी देखील कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळे उपायुक्त संदीप खलाटे, परी मंडळ १चे उपायुक्त माधव जगताप व सहायक आयुक्त अशोक भंवरी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. या कारवाईत १८ बिगारी सेवक, ३ ट्रक, आणि एक जेसीबीच्या साह्याने अतिक्रमणे काढण्यात आली. तब्बल ४००० स्केअर फूटवरील कच्चे आणि पक्के शेड पाडण्यात आले. तर ३ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. यात शेड २३, १ हातगाडी, ३ काऊंटर, ६ पथारी, खुर्च्या, १ स्टॉल व आदी साहित्याचा समावेश होता.
हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालय देखील गेल्या ४ दिवसांपासून अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू आहे. प्रामुख्याने सोलापूर रोड, सासवड रोड, काळेपड, चिंतामणी नगर, मोहम्मद वाडी, हांडेवाडी इत्यादी ठिकाणी अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ५ जवान, २ पोलिस कर्मचारी, मध्यवर्ती (भरारी) पथक व हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाकडील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालय अतिक्रमण निरीक्षक राकेश काची, सहायक निरीक्षक कुणाल मुंढे, साईनाथ निकम, अभिलाष कांबळे, वामन सुद्रिक, माधव बहिरम तसेच मध्यवर्ती पथकाकडील सहाय्यक निरीक्षक सौरभ सरोदे, निशांत सावंत, तुषार कदम आदींनी ही कारवाई केली. या कारवाईत १८ हातड्या, ११० पथारी, इतर १०४, ३९ शेड, १ स्टॉल, २ काउंटर व ३ सिलेंडर जप्त करण्यात आले.
शहरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे. याबाबत आयुक्त नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत. नागरिकांच्या तक्रारीनुसार शहरातील विविध भागात ही कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम करु नये.
- संदीप खलाटे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
23 Jul 2025
श्रीमोरया गोसावी महाराजांची पारंपरिक द्वारयात्रा उद्यापासून
24 Jul 2025
अखेर बिबट्या पिंजर्यात
23 Jul 2025
अंशुल कंबोजला भारतीय संघात स्थान
21 Jul 2025
लोकमान्य टिळक यांना अभिवादन
24 Jul 2025
विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे अर्ज उपलब्ध
22 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
23 Jul 2025
श्रीमोरया गोसावी महाराजांची पारंपरिक द्वारयात्रा उद्यापासून
24 Jul 2025
अखेर बिबट्या पिंजर्यात
23 Jul 2025
अंशुल कंबोजला भारतीय संघात स्थान
21 Jul 2025
लोकमान्य टिळक यांना अभिवादन
24 Jul 2025
विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे अर्ज उपलब्ध
22 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
23 Jul 2025
श्रीमोरया गोसावी महाराजांची पारंपरिक द्वारयात्रा उद्यापासून
24 Jul 2025
अखेर बिबट्या पिंजर्यात
23 Jul 2025
अंशुल कंबोजला भारतीय संघात स्थान
21 Jul 2025
लोकमान्य टिळक यांना अभिवादन
24 Jul 2025
विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे अर्ज उपलब्ध
22 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
23 Jul 2025
श्रीमोरया गोसावी महाराजांची पारंपरिक द्वारयात्रा उद्यापासून
24 Jul 2025
अखेर बिबट्या पिंजर्यात
23 Jul 2025
अंशुल कंबोजला भारतीय संघात स्थान
21 Jul 2025
लोकमान्य टिळक यांना अभिवादन
24 Jul 2025
विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे अर्ज उपलब्ध
22 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
टीआरएफ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना