E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रोहित-विराटसाठी एकदिवसाचा विश्वचषक खेळणे अत्यंत अवघड : गांगुली
Wrutuja pandharpure
27 Jun 2025
मुंबई
: इंग्लंड दौर्यावरील कसोटी मालिकेआधी रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याआधी टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर दोघांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही जोडगोळी फक्त वनडेत खेळताना दिसेल. दोघांचे ध्येय 2027 मध्ये रंगणारी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्याचे असेल, अशीही चर्चा रंगत आहे. दरम्यान सुनील गावसकर यांच्यानंतर आता सौरव गांगुलीनं या दोघांना आगामी वनडे वर्ल्ड कप संघात स्थान मिळवणं सोपं नसेल, असे म्हटले आहे. दोन दिग्गजांच्या अनुपस्थितीत इंग्लंड दौर्यावर टीम इंडियाने धमक दाखवून दिल्याची चर्चा रंगत असताना सौरव गांगुलीनं दोन दिग्गजांसंदर्भात केलेली भविष्यवाणी चर्चेचा विषय ठरत आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं पीटीआयशी संवाद साधताना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. गांगुली रोहित-कोहलीसंदर्भात म्हणाला आहे की, आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, प्रत्येक खेळाडूप्रमाणे एक दिवस हा खेळ त्यांच्यापासून आणि ते या खेळापासून दूर जातील. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ 27 वनडे सामने खेळणार आहे.वर्षाला फक्त 15 वनडे सामने खेळून टीम इंडियात जागा निश्चित करणं त्यांच्यासाठी खूपच कठीण टास्क आहे. दोघांनाही यासंदर्भात काही सल्ला देण्याची गरज नाही, असे म्हणत गांगुलीनं या जोडीसाठी वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात स्थान मिळवणं अवघड असल्याचे म्हटले आहे.
यावेळी सौरव गांगुलीनं विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीसंदर्भातही भाष्य केले. कोहलीचा निर्णय आश्चर्यचकित वाटला नाही. टीम इंडियासाठी ही गोष्ट चिंतेची बाबही वाटत नाही. पण त्याची रिप्लेसमेंट शोधणं हे एक मोठं आव्हान आहे, असे गांगुलीनं म्हटले आहे. भारतीय संघ इंग्लंड दौर्यानंतर बांगलादेश दौर्यावर वनडे मालिका खेळणार आहे. या दौर्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार की, ही जोडी थेट ऑस्ट्रेलिया दौर्यावरच मैदानात उतरणार तेही पाहण्याजोगे असेल.
Related
Articles
अमरनाथ यात्रेसाठी साडेतीन हजार यात्रेकरू रवाना
25 Jul 2025
भुवनेश्वरमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात आग
19 Jul 2025
निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला दगड
20 Jul 2025
कर्नाटकातील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी
23 Jul 2025
लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित कीर्तन
24 Jul 2025
पुण्यात मिश्र कचर्याची समस्या वाढली

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)