गुजरातमध्ये ‘आप’ला धक्का   

अहमदाबाद : गुजरातच्या पोटनिवडणुकीत विजयाचा गुलाल उधळून दोन दिवस होत नाहीत तोच ‘आप’च्या एका ज्येष्ठ आमदाराने पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर, पक्षाने आमदार उमेश मकवाना यांना पक्षविरोधी कारवायांसाठी निलंबित केले.
 
मकवाना हे बोटाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. गांधीनगरमध्ये पत्रकार परिषदेत मकवाना यांनी आपण राष्ट्रीय सचिव आणि राज्य विधानसभेतील प्रतोद पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. आमदारपदाचा राजीनामा देण्याचा विचार करत आहात का? असे विचारले असता, याबाबत आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. यादरम्यान, गुजरात ‘आप’चे अध्यक्ष इसुदान गढवी यांनी मकवाना यांच्या निलंबनाची घोषणा केली. मकवाना यांना पक्षविरोधी कारवायांबद्दल ’आप’मधून पाच वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे, असे गढवी यांनी निवेदनात म्हटले आहे.

Related Articles