E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पत्नीच्या कानाखाली मारणे म्हणजे छळ नव्हे...!
Wrutuja pandharpure
29 May 2025
हगवणे यांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तीवाद ? । सासरा व दिराला तीन दिवसांची कोठडी
पुणे
: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी न्यायालयात पोलिसांनी केली. मात्र, पोलिस कोठडीला विरोध करताना हगवणे यांच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला. वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करायची. वैष्णवीची प्रवृत्ती आत्महत्या करण्याची होती. तसेच, पतीने पत्नीच्या कानाखाली मारणे म्हणजे छळ नव्हे, असा युक्तीवाद हगवणे यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. दरम्यान, वैष्णवीची सासू, पती आणि नणंदेला एक दिवसाची तर सासरे आणि दिराला तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली.
या प्रकरणात सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, पती शशांक हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना काल शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी हगवणे यांच्या वकिलांनी हा युक्तीवाद केला. न्यायाधीशांनी आरोपींना पोलिस कोठडी दरम्यान पोलिसांकडून काही त्रास झाला का? हे विचारले असता सर्वांनी नाही, असे उत्तर दिले. शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे अनेक जखमा असल्याचे नमूद आहे. तिचा छळ झाला असल्याचा आरोपही वैष्णवीच्या आई-वडिलांनी केला आहे.
हगवणे यांच्यावतीने वकिलांनी न्यायालयात म्हटले की, एखाद्या पतीने पत्नीच्या कानाखाली मारल्या म्हणजे तो छळ होत नाही. आमच्यावर ४० लाखांची मोटार घेतल्याचा आरोप केला जात आहे. परंतु, आमच्या घरात ५ कोटींच्या मोटारी आहेत. वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅटींग करायची. त्यामुळे त्या व्यक्तीने तिला त्रास दिला असेल.या त्रासातून वैष्णवीने आत्महत्या केली असावी. हगवणे यांच्या वतीने वकील विपुर दोशी यांनी पोलिस कोठडीला विरोध केला. पोलिस कोठडी देण्याची काही गरज नाही. हगवणे यांनी सोने कोणत्या बँकेत ठेवले आहे, हे आधीच सांगितले आहे. तसेच, मोबाइल चॅट व्हायरल झाले असल्याने चॅट लपवण्याच्या दाव्यात तथ्य नाही. वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करायची. आम्ही ते पकडले. तिच्या आत्महत्येचे मुख्य कारण वेगळे आहे; पण पोलिस ते शोधत नसल्याचा आरोपही वकिलांनी न्यायालयात केला.
सरकारी वकिलांचा युक्तीवाद
आरोपींचे मोबाईल सापडलेले नाहीत. फरारी आरोपी निलेश चव्हाण कुठे आहे? याची चौकशी करायची आहे. आरोपींनी हुंड्यात मिळालेले ५१ तोळे सोने बँकेत तारण ठेवले आहे. त्याची माहिती घ्यायची आहे. आरोपींनी वैष्णवीला ज्या हत्याराने मारहाण केली. ती सर्व हत्यारे हस्तगत करायची आहेत, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.
Related
Articles
वाचक लिहितात
14 Jun 2025
एसटी महामंडळाअंतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती
15 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
एसटी महामंडळाअंतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती
15 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
एसटी महामंडळाअंतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती
15 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
एसटी महामंडळाअंतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती
15 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !