कांगोच्या पंतप्रधानपदी प्रथमच महिलेची निवड   

किशादा : कांगोच्या पंतप्रधानपदी प्रथमच महिलेची निवड झाली आहे. जुडिथ सुमिनवा तुलुका, असे त्यांचे नाव आहे. त्या माजी नियोजन मंत्री आहेत. अध्यक्ष फेलिक्स शिसेकेडी यांनी याबाबतची घोषणा मंगळवारी केली. 
 
कांगो खनिज समृद्ध देश आहे. पंतप्रधान पदी निवड होताच  जुडिथ सुमिनवा तुलुका यांनी सांगितले की, देशातील हिंसक घटना रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. रवांडा सीमेवर हिंसाचार उफाळून आला होता. तेव्हा ७० लाख नागरिक निर्वासित झाले होते. त्यानंतर हा परिसरातील संघर्ष मानवावरील सर्वात मोठे जागितक संकट असल्याचे संयुक्त राष्ट्राने जाहीर केले होते. शांतता आणि विकासासाठी तुलुका यांची  पंतप्रधान पदी निवड केल्याचे अध्यक्ष शिसेकेडी यांनी स्पष्ट केले आहे. 

Related Articles