E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
फटाक्याच्या गोदामात स्फोटानंतर भीषण आग
Samruddhi Dhayagude
12 Feb 2024
केरळमध्ये दोघांचा मृत्यू; १६ जखमी
कोची : केरळमधील त्रिपुनिथुरा येथील फटाक्याच्या गोदामात सोमवारी भीषण स्फोटानंतर आग लागली. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. लहान मुले आणि महिलासह 16 जखमी झाले आहेत.
जखमींना कलाास्सेरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले आहे. त्यापैकीं चौघांची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला व्यक्ती तिरूवनंतपूरम येथील आहे. त्याचे नाव विष्णू असे आहे. गोदामातील आग अन्यत्र पसरली. त्याची झळ 25 पेक्षा अधिक दुकानांना बसली आहे. त्यांचे नुकसान झाले. तसेच दोन दुचाकी भस्मसात झाल्या आहेत. स्फोटाचे नेमके कारण समजलेेले नाही. गोदामात एका ठिकाणी फटाक्याचा साठा ठेवला होता. त्याला आग लागून भीषण स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. स्फोटाचे आवाज अनेक किलोमीटपर्यंत ऐकू आले. तसेच हादरेही जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. स्फोट एवढा भीषण होता की, अग्निशमन केंद्र देखील हादरले होते. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग नियंत्रणात आणली. परंतु स्फोट आगीनंतर परिसराचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दाट नागरी वस्तीत फटाक्याचे गोदाम होते.ते उभारण्यासाठी परवानगी घेतलेली नव्हती, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच तपासही सुरू केल्याचे ते म्हणाले.
Related
Articles
मिचेल सँटनरने उडविला विराटचा त्रिफळा
26 Oct 2024
’तुतारी’ चिन्हाला ’ट्रम्पेट’ची मान्यता
01 Nov 2024
आला सण, काढा ‘ऋण’
27 Oct 2024
अल्पवयीन मोटारचालकाने दोघींना चिरडले
29 Oct 2024
महिलांच्या सुरक्षेकडे भारताने लक्ष द्यावे
29 Oct 2024
लष्कराच्या रुग्णवाहिकेवर दहशतवाद्यांकडून गोळीबार
28 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पुण्यातील पाच मतदारसंघांचे चित्र स्पष्ट
2
समाजाच्या उत्थानासाठी ग्रंथालयांची गरज
3
मन उजळणारी दिवाळी
4
आला सण, काढा ‘ऋण’
5
दिवाळी अंक आणि साहित्य रसिक
6
मनसेची परीक्षा (अग्रलेख)