E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इस्रायलसोबतचा शांतता करार रद्द करू
Samruddhi Dhayagude
12 Feb 2024
रफाह : गाझाच्या दाट लोकवस्ती असलेल्या रफाहमध्ये इस्रायली सैन्य पाठविल्यास शांतता करार रद्द करू, अशी धमकी इजिप्तने इस्रायलला दिली आहे. इस्रायली सैन्याने रफाहमध्ये हमासविरोधात लढा दिल्यास या प्रदेशाच्या मुख्य मदत पुरवठा मार्ग बंद होऊ शकतो, असे दोन इजिप्शियन अधिकार्यांनी रविवारी सांगितले.
हमास विरुद्ध चार महिने सुरू असलेले युद्ध जिंकण्यासाठी रफाहमध्ये सैन्य पाठवणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले आहे.
गाझाच्या 2.3 दशलक्ष लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोक इतर भागातील लढाईपासून वाचण्यासाठी रफाहला पळून आले आहेत. सीमेजवळील मोठ्या तंबू छावण्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या आश्रयस्थानांमध्ये ते थांबले आहेत. रफाहमध्ये इस्रायलने हल्ला केल्यास गाझामधील मानवतावादी परिस्थिती आणखी बिघडेल. पॅलेस्टिनी निर्वासितांचा मोठा ओघ इजिप्तला येण्याची भीती आहे, त्यामुळे रफाहमध्ये इस्रायली सैन्याने हल्ला केल्यास शांतता करार रद्द करण्याची धमकी इजिप्तने दिली आहे.
मध्य गाझा आणि दक्षिणेकडील खान युनिस शहरात जोरदार लढाई सुरू आहे. रफाहमधील हल्ल्याने शहरातील आवश्यक अन्न आणि वैद्यकीय पुरवठा वितरीत करण्याचा एकमेव मार्ग कापला जाऊ शकतो. कतार, सौदी अरेबिया आणि इतर देशांनीही इस्रायलने रफाहमध्ये सैन्य हलविल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की, गेल्या 24 तासांत संपूर्ण प्रदेशात ठार झालेल्या 112 लोकांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत, तसेच 173 जखमी लोक आहेत. युद्धाच्या सुरुवातीपासून या पट्टीतील मृतांची संख्या 28 हजार 176 वर पोहोचली.
Related
Articles
देशात लवकरच जनगणना करण्याचा केंद्राचा विचार
16 Sep 2024
क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक - सेनापती बापट
13 Sep 2024
सत्तेवर आल्यास बिहारमधील मद्यबंदी उठवू : प्रशांत किशोर
16 Sep 2024
कोचिंग सेंटर मृत्यू प्रकरण चौैघांना हंगामी जामीन
14 Sep 2024
महान हटयोगी - विसोबा खेचर
12 Sep 2024
वाद टाळा, मित्रपक्षांसोबत समन्वय ठेवा : नड्डा
15 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
सोने झळाळणार, वाहनांची घसरण
4
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
5
वाचक लिहितात
6
वाचक लिहितात