E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
उजनीवरील ग्रीन हायड्रोजन, अणुऊर्जा प्रकल्प रद्द !
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
फ्लोटिंग सोलर आणि १.४ गिगावॅटचे एआय डेटा सेंटर होणार ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
सोलापूर,( सूर्यकांत आसबे ) : उजनी धरण परिसरातील प्रस्तावित प्रकल्पांबाबत सुरू असलेल्या चर्चेला जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. उजनी परिसरात ग्रीन हायड्रोजन आणि स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर (एसएमआर) आधारित अणुऊर्जा प्रकल्प होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, फ्लोटिंग सोलर, बॅटरी ऊर्जा साठवणूक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (एआय) डेटा सेंटर हे तीन प्रमुख प्रकल्प प्रस्तावित असून ते टप्प्याटप्प्याने उभारण्यात येणार आहेत.
या प्रकल्पासाठी राज्य शासनाने १६ एप्रिल २०२६ रोजी सामंजस्य करार केला आहे. प्रस्तावानुसार, उजनी जलाशयावर २ हजार मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. जलाशयाच्या एकूण ३३ हजार ६३० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३ हजार हेक्टर म्हणजेच सुमारे ९ टक्के क्षेत्राचा वापर केला जाणार आहे. उर्वरित ९१ टक्के जलक्षेत्र खुले राहणार आहे.
सौरऊर्जेतून निर्माण होणारी वीज साठविण्यासाठी १ हजार ८०० मेगावॅट-तास क्षमतेची बॅटरी ऊर्जा साठवणूक व्यवस्था उभारण्याचे नियोजन आहे. तसेच १.४ गिगावॅट म्हणजेच १ हजार ४०० मेगावॅट क्षमतेचे अत्याधुनिक एआय डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. हे डेटा सेंटर सहा टप्प्यांत विकसित करण्याचे नियोजन आहे.
डेटा सेंटरसाठी पारंपरिक शीतकरण पद्धतीऐवजी 'क्लोज्ड लूप डायरेक्ट टू चिप' तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. यासाठी वार्षिक ०.४२ टीएमसी आणि कमाल ०.५ टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विद्यमान सिंचन व पाणीवाटप व्यवस्थेत बदल केला जाणार नसल्याची ग्वाहीही देण्यात आली आहे.
या प्रकल्पांमुळे सुमारे २ हजार ८०० कायमस्वरूपी रोजगार आणि ४० हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात भीमानगर-रांजणी, तरटगाव आणि हिंगणगाव येथील एकूण ४१५.७५ एकर शासकीय जमिनीचा वापर प्रस्तावित आहे.दरम्यान, प्रकल्पांबाबत स्थानिक नागरिकांच्या हरकती, पर्यावरणीय परिणाम आणि मच्छीमारांच्या उपजीविकेचे प्रश्न विचारात घेऊन सार्वजनिक सुनावणी घेतल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ग्रीन हायड्रोजन आणि अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावातून वगळले असले तरी मात्र २ हजार मेगावॅट फ्लोटिंग सोलर, १.४ गिगावॅट एआय डेटा सेंटर आणि बॅटरी स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित कायम ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान या प्रकल्पासाठी कोणत्याही एका शेतकऱ्याची एक गुंठा ही जमीन घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करतानाच संपूर्ण प्रकल्प हा जलसंपदा विभागाच्या मालकीच्या जागेवरच होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले आहे.
आमदार रोहित पवार यांची आक्रमकता आणि सरकारची माघार !
उजनी धरणावरील या प्रकल्पाच्या विरोधात आमदार रोहित पवार खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार अभिजीत पाटील माजी आमदार संजय शिंदे यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी भिमानगर येथे तब्बल चार तास 'रास्ता रोको' करून सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन उभारले होते. या प्रकल्पामुळे उजनी धरणाच्या पाणी क्षमतेवर परिणाम होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या जीवनावर सुद्धा परिणाम होणार असल्याबाबत नाराजी पसरली होती .पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तरी उजनी धरणावरील हे प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला होता. अखेर सरकारने नमते घेत दोन ते तीन महत्त्वाचे प्रकल्प गुंडाळले आहेत. आता उजनी धरणावर फक्त तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आणि एआय डेटा सेंटर हे दोनच प्रकल्प होणार आहेत. आमदार रोहित पवार याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Related
Articles
युक्रेनवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात पाच ठार
07 Nov 2026
वैचारिक नक्षलवादाचा लोकशाहीला धोका
09 Nov 2026
आयझेनकोट होणार इस्रायलचे नवे पंतप्रधान
09 Nov 2026
विशेष मुलांच्या दिवाळी साहित्य प्रदर्शनाला प्रतिसाद
05 Nov 2026
आर्यवीर सेहवागचे धडाकेबाज अर्धशतक
07 Nov 2026
नव्या पिढीचा नवा विचार
10 Nov 2026
Comments
(0)
Be the first to share your view on this news.
Leave
a comment
Name *
Email *
Mobile *
Comment *
0
/ 300
Website
Comments are published after review by the editor. Abusive or offensive language is not allowed.
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित