E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
मनोरंजन
तालवाद्यांचे नादवैचित्र्य आणि कथक नृत्याची पर्वणी
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
14 वा ‘तालचक्र’ महोत्सव
पुणे
: भारतीय शास्त्रीय संगीत, समकालीन संगीत आणि कथक नृत्य यांच्या अनोख्या मिलाफातून साकारलेली ‘फ्युजन 2026’ ही विशेष प्रस्तुती, एकल तबलावादन, कथक नृत्यप्रस्तुती आणि पखवाज केंद्रस्थानी ठेवून केलेली समूह प्रस्तुती, अशा कलावैविध्याचा अनुभव रसिकांना तालचक्र महोत्सवातून मिळाला.
ज्येष्ठ तबलावादक पं. विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला तालचक्र महोत्सवाचे हे 14 वे वर्ष होते. हा महोत्सव गणेश कला क्रीडा मंच येथे झाला. पं. विजय घाटे, भरत कुलहळ्ळी, प्रवीण बढेकर, शमा भाटे आणि मनीषा साठे आदी उपस्थित होते.
भारतीय शास्त्रीय संगीत, तालवाद्ये, पाश्चात्त्य संगीत आणि कथक नृत्य यांचा सुरेल मेळ घालत पहिल्या दिवशी शीतल कोलवलकर यांचे कथक नृत्य तर हार्मोनियमवर तन्मय देवचके, पढंतमध्ये सागर पाटोकार, गायनात नागेश आंडगावकर, जेम्बेवर शिखरनाद कुरेशी, की-बोर्डवर संगीत हळदीपूर, सतारीवर रवी चारी, बास गिटारवर शेल्डन डिसिल्वा, ड्रम्सवर गिनो बँक्स आणि सॅक्सोफोनवर जॉर्ज ब्रूक्स या कलाकारांनी फ्युजन प्रकारात एकत्रित सादरीकरण केले. कार्यक्रमाची सुरुवात ‘वाम सूत्र’, ‘योगी’ आणि ‘मायरा’ या तीन रचनांनी झाली. अकरा मात्रांच्या तालचक्रावर आधारित ‘वाम सूत्र’, राग जोगावर आधारित ‘योगी’ आणि राग यमनवर आधारित ‘मायरा’ या रचनांनी संगीताच्या विविध छटा उलगडल्या.
कथक नृत्यांगना शीतल कोलवालकर यांनी रूपक तालात थाट, आमद आणि तत्कार सादर केले. नृत्य आणि संगीत यांचा तालबद्ध संवाद उलगडणारी जुगलबंदी हे या सादरीकरणाचे विशेष आकर्षण ठरले. यानंतर राग भैरवीतील ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’ ही रचना सादर करण्यात आली. महोत्सवाच्या दुसर्या दिवशी फर्रुखाबाद घराण्याचे प्रख्यात वादक पं. संजय मुखर्जी यांचे एकल तबलावादन झाले. कथक नृत्यांगना दुर्गा आर्या यांची कथक प्रस्तुती आणि पं. अनिंदो चटर्जी आणि पं. मुकुंदराज देव यांची एकत्रित तबलासंगत, सोबत झुबेर शेख (सतार) आणि श्रीरंग टेंबे (गायन व संवादिनी) असे सादरीकरण रसिकांना आनंद देणारे ठरले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
Related
Articles
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तिसऱ्या अपत्याचा नियम रद्द होणार?
04 Nov 2026
त्रिपुरात पथकावरील हल्ल्यानंतर बीएसएफची आक्रमक कारवाई
09 Nov 2026
झुंजार अन् जिगरबाज!
08 Nov 2026
दुष्काळग्रस्त भागांची गोखले संस्थेकडून पाहणी; दीड महिन्यात शासनाला अहवाल
06 Nov 2026
युक्रेनवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात पाच ठार
07 Nov 2026
कुशल नेतृत्व - डॉ. दीपक टिळक
06 Nov 2026
Comments
(0)
Be the first to share your view on this news.
Leave
a comment
Name *
Email *
Mobile *
Comment *
0
/ 300
Website
Comments are published after review by the editor. Abusive or offensive language is not allowed.
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित