E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
वाचक लिहितात
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
भाजपला आंदोलनजीवी म्हणावे का?
२०१८ मध्ये एका राष्ट्रीय लोकप्रतिनिधी संमेलनात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ मोर्चे काढून जनतेचे समर्थन मिळवण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत, असे म्हटले होते. तुम्ही सत्तेत असा किंवा विरोधी पक्षात, जनतेसाठी किती काम करता याला महत्त्व आहे, असा त्यांच्या विधानाचा आशय होता. आंदोलन करणार्यांना त्यांनी ’आंदोलनजीवी’ असेही संबोधले होते. मग त्यांच्याच भाजप पक्षाला १ नोव्हेंबरला देशभर मोर्चे आणि पदयात्रा काढण्याची गरज का भासली? इंडिया आघाडीने दिल्लीतील रामलीला मैदानावर मतदारयाद्यांमधील कथित अनियमिततेविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही देशभर आंदोलने केली. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी हे शक्तिप्रदर्शन होते, असे भाजप सांगेलही; पण सत्तेत असलेल्या पक्षाने आपल्या कामातून आणि वस्तुस्थिती मांडून विरोधकांना उत्तर देणे अपेक्षित नाही का? विरोधी पक्षांच्या आंदोलनांमुळे वाहतूक कोंडी होते, सामान्य नागरिकांना त्रास होतो, अशी टीका भाजप नेते वारंवार करतात. मग भाजपच्या मोर्चांमुळे जनतेची गैरसोय होत नाही का?
दीपक गुंडये, वरळी.
प्राण्यांचा अधिवास धोक्यात
कर्जत तालुक्यातील ’टोरंट’ वीज प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या वृक्षतोडीच्या ठिकाणी उदमांजर मृतावस्थेत आढळल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. प्रत्यक्षात किती वन्यजीव - पशुपक्ष्यांचे भवितव्य तसेच वनस्पतींच्या विविध प्रजाती या प्रकल्पामुळे धोक्यात आल्या आहेत. तूर्तास या उदमांजराच्या मृत्यूस जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून खटला का भरू नये? भारतात वन्यजीवांची अवैध शिकार, हत्या आणि तस्करी रोखण्यासाठी ’वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ लागू करण्यात आला आहे. ’टोरंट’ पॉवर प्रकल्पासाठी राज्य प्राणी शेकरूचा अधिवास असलेल्या या कर्जत - भीमाशंकर परिसरातील वनजमिनीवरील पहिल्या फेरीत तब्बल ३२ हजार, तर दुसर्या फेरीत ४५ हजार झाडांवर कुर्हाड चालवली जाणार आहे. तर स्थानिकांच्या मते दोन ते अडीच लाख वृक्ष तोडले जाणार आहेत. साहजिकच शेकरू या गोंडस जीवाचा देखील अधिवास धोक्यात आला आहे.
बाळकृष्ण शिंदे, पुणे
पाणी साठवा
नोव्हेंबर उजाडला तरीही शहरात गारठा नाही. रात्री रिमझिम पाऊस पडतो. सध्या हवामान बदलते आहे. जुन्या इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवता येईल. जे एजन्सी हे काम करतात त्यांचे मार्गदर्शन, सल्ला, तंत्रज्ञान वापरून पाणी जमिनीत मुरेल असे करावे. संपूर्ण इमारती, रस्ता सिमेंट कामाला परवानगी नसावी.
नीलम सांगलीकर, पुणे.
पाकिटमारांचा सुळसुळाट!
दिवाळी तोंडावर आल्याने सर्वत्रच बाजारपेठा आणि दुकानांतही गर्दी दिसू लागली आहे. या दिवसांत लोक परिवारासह खरेदीला बाहेर पडतात. अनेक जण यूपीआय अॅप्सच्या माध्यमातून पेमेंट करतात. त्यामुळे खिशातील मोबाईल वारंवार बाहेर काढावा लागतो. आपल्यासाठी ही नियमित बाब असली तरी लोकांच्या गर्दीत सहभागी झालेले खिसेकापू आणि पाकीटमार आपल्यावर बारीक लक्ष ठेवून असतात. संधी मिळताच गर्दीचा फायदा घेऊन खिशातील पाकीट, मोबाईल ते सहजपणे लंपास करतात. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी जाताना अंगावर अधिक दागिने न घालणे, पाकिटात बेताची रोख रक्कम ठेवणे, पाकीट आणि मोबाईल खिशात ठेवताना ते काळजीपूर्वक ठेवणे हेच अधिक इष्ट ठरेल.
नरेश घरत, चेंबूर
गड-किल्ल्यांची आवड जोपासायला हवी
गडकोट किल्ले हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. किल्लेच आपले खरे वैभव आहे. प्रत्येक गड किल्ल्यांचा स्वतंत्र इतिहास असून या प्रत्येक गड किल्ल्याने येथील भूमिपुत्रांचा पराक्रम आणि वैभव अनुभवले आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बारा गडकिल्ल्यांचा गेल्या वर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला. शिवरायांच्या पराक्रमाची आठवण म्हणून गेल्या काही वर्षांत दिवाळीच्या आधी किल्ले बांधण्याची प्रथा आहे. दिवाळीचा आणि किल्ले बांधण्याच्या प्रथेचा तसा काही संबंध नसला, तरी त्यानिमित्ताने बालमनावर पराक्रमाचे, स्वाभिमानाचे आणि त्यागाचे संस्कार निर्माण होण्यास मदत होते. उभारलेल्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसह अष्टप्रधान मंडळ आणि मावळे यांच्या प्रतिकृती ठेवल्या जातात, ज्या शिवरायांच्या आदर्श राज्यकारभाराची जाणीव करून देतात. त्यामुळे या प्रथेचे जतन करणे आवश्यक आहे.
मोक्षदा घाणेकर, काळाचौकी
Related
Articles
निवडणुकीत भारतीय वंशाच्या नागरिकांचा डंका
05 Nov 2026
शेतकरी, महिलांकडून सक्तीने कर्जवसुली नको
05 Nov 2026
धाराशिवमध्ये ऐन दिवाळीत एका अग्नितांडव !
09 Nov 2026
मुहूर्ताच्या सत्रात शेअर बाजारात घसरण
09 Nov 2026
दुष्काळग्रस्तांच्या चेहर्यावर दिवाळीचा आनंद
08 Nov 2026
शहर शिवसेनेच्या दुष्काळग्रस्त सहाय्यता हेल्पलाइनची घोषणा
05 Nov 2026
Comments
(0)
Be the first to share your view on this news.
Leave
a comment
Name *
Email *
Mobile *
Comment *
0
/ 300
Website
Comments are published after review by the editor. Abusive or offensive language is not allowed.
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित