उधमपूरमध्ये बस दरीत कोसळली   

दोन ठार; १५ जखमी

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात एका दुर्गम भागात प्रवासी बस रस्त्यावरुन घसरून दरीत कोसळली. या अपघातात एका बालिकेसह दोन जण ठार झाले. तर, १५ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.
 
या घटनेबद्दल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच, पीडित व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्व आवश्यक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
 
बस पचौंडहून रामनगरच्या दिशेने जात असताना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास गुल्ली गला येथे हा अपघात झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले आणि जखमींना बसंतगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना रामनगर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सुनीतादेवी (वय-२४) आणि चार वर्षांची तक्षिका यांचा मृत्यू झाला. जखमींपैकी ११ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना पुढील उपचारासाठी उधमपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुनील भारद्वाज यांनी रामनगर रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

 

Related Articles

Comments (0)

Be the first to share your view on this news.

Leave a comment

0 / 300
Comments are published after review by the editor. Abusive or offensive language is not allowed.