E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
विज्ञान-तंत्रज्ञान
स्टारलिंक : नाकापेक्षा मोती जड!
Samruddhi Dhayagude
21 Oct 2026
भारतीयांना गरिबीत ठेवण्यासाठी होणारा खर्च परवडेल?
अभिजित अकोळकर
अमेरिकेचे धनाढ्य उद्योगपती एलॉन मस्क यांची उपग्रहांवर आधारीत इंटनेट सेवा विविध देशांत पुरवत आहेत. त्यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या माध्यमातून ही सेवा भारतातील दुर्गम भागात पुरवली जाण्याची योजना आहे. अनेक उपग्रह एकाच वेळी आकाशात सोडून ते कार्यरत राहतात. ते एकमेकाला जोडलेले असतात. हा स्टारलिंक प्रकल्प भारतीयांना गरिबीत ठेवण्यासाठी करण्यात येणारा खूप मोठा खर्च असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. (It costs a lot of money to keep indian people in poverty) असे प्रसिद्ध विधान तंतोतंत लागू होत आहे. नाकापेक्षा मोती जड असलेला हा प्रकल्प भारताच्या वरवरचा फायद्याचा वाटत असला तरी विविध राज्यांतील नागरिकांची भविष्यात आर्थिक कोंडी करणारा आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरणारा आहे.
भारतात स्टारलिंक प्रकल्प राबविण्याची मस्क यांची धडपड सुरू आहे. तो राबविणे सोपे असले तरी त्याची जबर किंमत भारतीयांना मोजावी लागणार आहे. कारण जाहीर मासिक प्लॅन (रहिवासी) दरमहा साधारण ८ हजार ६०० रुपये असून त्यात अमर्याद डेटा आणि उत्तम अपटाइमसह आहे. हार्डवेअर किट एकदा घ्यायचा खर्च - डिश आणि राउटर धरून ३४ हजार रुपये आहे. मोफत चाचणी कालावधी ३० दिवसांसाठी आहे.
पसंत पडला नाही तर पूर्ण परतावा देण्याची योजना आहे. काही योजनांनुसार ग्रामीण भागात ३ हजार ते ४ हजार रुपये आकारले जातील, असे काही वृत्तात म्हटले आहे. या प्रकल्पात अनेक उपग्रहांद्वारे थेट इंटरनेट सेवा पुरवली जाणार आहे. जेथे नेटवर्कचा अभाव आहे तेथे प्रामुख्याने ग्रामीण आणि दुर्गम भागांत ही सेवा फायदेशीर ठरणार आहे. व भारतीय अवकाशात कमी उंचीवर उपग्रह फिरणार आहेत. तसेच कंपनी अमेरिकेच्या संरक्षण खात्याशी जवळीक साधून आहे. या उपग्रहांचे सर्व अधिकार कंपनीकडे राहणार आहेत युद्धजन्य स्थितीवेळी अमेरिका कधीही सेवा बंद करून देशाला सरकारला ती अडचणीत आणू शकते. युद्धावेळी युक्रेनला त्याची प्रचिती आली होती. सेवा फायदेशीर असली तरी तितकीच धोकादायक ठरू शकते.
प्रथम परदेशी कंपन्या स्वस्त दरात सेवा देतात. मग सेवा अंगवळणी पडली की दर वाढवतात. पर्याय नसल्याने ती ग्राहकांच्या माथी पडते. १९९० च्या दशकात एन्रॉन हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ येथे उभारलेला एक अत्यंत गाजलेला आणि वादग्रस्त वीज प्रकल्प होता. १९९२ मध्ये राज्य वीज मंडळाने करार केला होता. आयात होणार्या नॅफ्था वायूवर तो प्रथम चालविला गेला. वायूचे दर वाढताच वीज महागली होती. इंधनाची बिले अमेरिकन डॉलर्समध्ये मोजली जात होती. पण भारतीय रुपयांमध्ये त्याचे बिल दिले जात होते. रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे नॅफ्थाची किंमत गगनाला भिडली, ज्यामुळे विजेचा दर प्रति युनिट ५ रुपयांच्या पुढे गेला. तेव्हा स्थानिक कोळशावर आधारित विजेपेक्षा जवळपास तिप्पट महाग दर होता. यामुळे अखेरीस महाराष्ट्र राज्य वीज मंडळाला वीज खरेदी थांबवण्यास भाग पडले आणि २००१ मध्ये तो प्रकल्प बंद करावा लागला. प्रकल्प उभारला खरा; मात्र वीज काही मिळाली नाही. नंतर कंपनी दिवाळखोरीत गेली. या अवसानघातकी प्रकल्पामुळे राज्यात विजेचे दर वाढले. लोककल्याणकारी राज्यकर्ते मोकाट सुटले आणि नागरिक, शेतकरी वीज दरवाढीच्या भारा खाली दबले गेले. आता स्टारलिंक आणून देशात नवा एन्रॉन आणू नका म्हणजे झाले.
भारत म्हणजे अमेरिका नाही
स्टारलिंकचा खर्च पाहता तो सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारा नाही. मस्क हे अमेरिकेचे उद्योगपती आहेत. अफाट पैसा त्यांच्याकडे आणि अमेरिकेतही आहे. ते तिथले सरकारी निर्णय बदलू शकतात. त्यामुळे ते अमेरिकेचे अध्यक्षही आहेत. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांना नावे ठेवू नका. तुम्ही जसा तुमच्या व्यवसायाचा विचार करता तसा ते सुद्धा करणारच. आपली बाजारपेठ परदेशी व्यावसायिकाला अनायसे कोणती कंपनी देईल? ज्यांनी दिली ते देश गुलामगिरीत खितपत पडले. दुसरीकडे ज्या कंपनीच्या नावात रिलायन्स अर्थात विश्वास आहे. तो त्यांनी भारतीयांचा विश्वास कमवून मिळविला आहे. देशात जी आधुनिक दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडली आहे ती जिओमुळेच.
भारतीयांना जी सेवा मिळत आहे त्यात ते सुखी आहेत. उपग्रह प्रणालीद्वारे रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल देखील पुरवू शकते. जगात १६५ देशांत सेवा देऊन तुम्ही गब्बर श्रीमंत झाला आहात. भारतीयांना गरीब ठेवण्यासाठी तुमच्यासाठी होणारे खर्च देशाला परवडणारे नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रथम देशाचा विचार करतात. आता आधुनिक गांधींनी देखील याचा विचार करावा. अगोदर एन्रॉनला पायघड्या घातल्या होत्या. वायूचे दर वाढताच राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली होती. नाकापेक्षा मोती जड तेव्हा झाला होता. तेव्हा १२ हजार कोटी देऊन केंद्राने प्रकल्प हाती घेतला होता.
भारतीय ’मिकी माऊस’ नाहीत
भारतीय ’मिकी माऊस’ नक्कीच नाहीत, जे डोनाल्ड डक यांच्या तालावर नाचतील. अमेरिका मात्र डोनाल्ड ट्रम्प यांची नक्की आहे. जगभर भरमसाठ आयात शुल्क लावून जागतिक व्यापाराची नासाडी केली. इराणवर हल्ला करून खनिज तेल आणि वायूचा जागतिक व्यापार बंद पडला. नोबेल पुरस्कार मला द्या, मला द्या म्हणून भीक मागितली. आता आणखी काय करायचे बाकी ठेवले आहे?
दुसरीकडे जग प्रत्येकजण आपल्या दृष्टीतून पाहतो. आपल्याप्रमाणे व्यक्ती आणि जग आहे, असे त्याला भासते. पण, तसे नसते. थोडक्यात सांगायचे तर, ग्रामीण नागरिकांचे राहणीमान वैयक्तिकरीत्या अत्यंत साधे आणि गरिबीचे असले, तरी त्यांची ही साधेपणाची आणि गरिबीची जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी पडद्यामागे मोठ्या प्रमाणावर व्यवस्थापकीय व आर्थिक खर्च स्टारलिंकसाठी करावा लागेल, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञान हवे, याबाबत दुमत नाही. पण, अंथरूण पाहून पाय पसरणे यातच हित आहे.
Related
Articles
राजकीय विश्लेषक म्हणून काम करणार : ट्रम्प
07 Nov 2026
पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी टँकरची व्यवस्था रात्रीही
09 Nov 2026
कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेचे उपमुख्यमंत्री शिंदे यांना निमंत्रण
05 Nov 2026
बंगालमध्ये स्फोटकांचा साठा जप्त
06 Nov 2026
पटेल, तटकरे यांना विलीनीकरणाची आस
07 Nov 2026
डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
06 Nov 2026
Comments
(0)
Be the first to share your view on this news.
Leave
a comment
Name *
Email *
Mobile *
Comment *
0
/ 300
Website
Comments are published after review by the editor. Abusive or offensive language is not allowed.
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)