E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
होर्मुजमध्ये तेलवाहू जहाजावर हल्ला
Samruddhi Dhayagude
03 Oct 2026
पाच भारतीय खलाशांची सुटका
मस्कत : होर्मुजच्या सामुद्रधुनीत कुवेतचा ध्वज असलेल्या ‘एमटी काजिमाह-३’ या खनिज तेलाची वाहतूक करणार्या जहाजावर क्षेपणास्त्रानी हल्ला करण्यात आला. जहाजावरील पाच भारतीय खलाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ओमानमधील भारतीय दूतावासाने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांना सुरक्षितपणे किनार्यावर आणले आहे.
पश्चिम आशियात जहाजावर पुन्हा हल्ला झाल्याने तणावात भर पडली आहे. भारतीय दूतावासानुसार, ‘एमटी काजिमाह-३’ होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जात होते. तेव्हा क्षेपणास्त्र त्याच्यावर आदळले. त्यानंतर जहाजावरील भारतीयांच्या सुटकेसाठी तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या. भारतीय दूतावासाने ओमानच्या अधिकार्यांशी संपर्क साधून बचाव मोहीम राबवली. भागतीयांच सुटकेसाठी मदत केली. त्याबद्दल भारतीय दूतावासाने ओमानचे आभार मानले.
हल्ल्यानंतर जहाजाला आग
जहाजावर १ ऑक्टोबर रोजी हल्ला झाला होता. ब्रिटनच्या ‘युनायटेड किंगडम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स’ला (यूकेएमटीओ) एका तेलवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची आणि आग लागल्याची माहिती मिळाली होती. एका अनोळखी क्षेपणास्त्राने हल्ला झाल्याचा दावा त्यांनी केला.
‘एमटी काजिमाह-३’ हे जहाज टोगोमधील लोमे बंदराच्या दिशेने जात होते. जहाजाचे संचालन कुवेत ऑइल टँकर कंपनीकडून केले जात असल्याचे वृत्तांत म्हटले आहे. दरम्यान, हल्ला नेमका कोणी केला? याबाबतची अधिकृत तपशील उपलब्ध झालेला नाही.
भारतीय खलाशांच्या सुक्षेचा प्रश्न मोठा
आखाती प्रदेशातील व्यापारी जहाजांवर काम करणार्या भारतीयांची संख्या मोठी आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, व्यापारी जहाजांवर सध्या ४ हजार ५०० हून अधिक भारतीय खलाशी कार्यरत आहेत. त्यापैकी १२ मालवाहू जहाजांवर १६३ भारतीय आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी यापूर्वी दिली होती. होर्मुजची सामुद्रधुनी पर्शियन आखाताला ओमानचे आखात आणि अरबी समुद्राशी जोडते. जागतिक खनिज तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. त्यामुळे व्यापारी जहाजे आणि खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून आंतरराष्ट्रीय ऊर्जा पुरवठ्याबाबतही चिंता वाढली आहे.
Related
Articles
एनसीसीसाठी अकादमीची प्रतीक्षाच!
03 Oct 2026
तालचक्र युवा महोत्सवाचे आयोजन
06 Oct 2026
विनर्स अकादमीची मिळकत अखेर सील
03 Oct 2026
शहरातील २४ स्थळे अजूनही अंधारात
03 Oct 2026
साखरेचे दर कमी होणार?
03 Oct 2026
युद्धनौकांना मदत करणार्या जहाजाचे जलावतरण
06 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान