ओमानने हल्लेखोर सह वैमानिकावर घातली होती बंदी   

न्यूयॉर्क : दुबई ते इस्रायलची राजधानी तेलअविव असा प्रवास करणार्‍या विमानाचे कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्‍या सह वैमानिकाची ओळख पटली आहे. तो ओमानचा नागरिक असून त्याचे नाव हमाम अल हम्मामी, असे आहे. अतिरेकी कारवायात गुंतल्या प्रकरणी चिंता व्यक्त करत ओमानने विमान सेवेत काम करण्यापासून रोखले होते.
 
गेल्या बुधवारी प्रवासादरम्यान मच्छार यांच्यावर हमाम याने प्राणघातक हल्ला चाकू आणि विमानाच्या कॉकपिटमधील कुर्‍हाडीचा वापर करुन केला होता. त्यात मच्छार जखमी झाले होते. हल्ल्यानंतर हमाम याने विमान ताब्यात घेत ते पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जोरदार प्रतिकार करत मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला होता प्रवाशांनी नंतर हमामला पकडून ठेवले आणि विमानातील राखीव वैमानिकांनी विमान सौदी अरेबियातील ताबूक विमानतळावर सुखरुप उतरवले होते.  दरम्यान, या प्रकरणाचा ओमान आणि सौदी अरेबियाकडून स्वतंत्र तपास सुरू आहे. 

Related Articles