E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
महिला कर्मचार्यांना हटविण्यामागे हिंदू गट नाही
Samruddhi Dhayagude
03 Oct 2026
आयफेल टॉवर भेटीचे प्रकरण
स्वतंत्र तपासात बाब उघड
पॅरिस : आयफेल टॉवरच्या भेटीप्रसंगी महिला कर्मचार्यांना हटविण्यास हिंदू धर्मीय गटाने सांगितले नव्हते, असे एका स्वतंत्र संस्थेने तपासात उघड केले आहे. याबाबतचा दावा बीएपीएस स्वामिनारायण ंसंस्थेच्या (बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम) या धार्मिक गटाने केला आहे.
हिंदू धर्मीय गटाने आयफेल टॉवरला ५ सप्टेंबर रोजी भेट दिली होती. तेव्हा सुरक्षा कर्मचार्यांना घटनास्थळापासून दूर ठेवले गेले होते. त्यांना दूर ठेवा, अशी विनंती गटाकडून करण्यात आली नव्हती, असे तपासात उघड झाले आहे. गेल्या महिन्यातील ही घटना आहे. तेव्हा गटाचे हिंदू धर्मीय गटाचे १०० हून अधिक जण आयफेल टॉवरला भेट देण्यासाठी गेले होते. तेव्हा महिला सुरक्षा कर्मचार्यांना कामापासून दूर ठेवले गेले. त्यांना भेदभावाची वागणूक दिली होती. मात्र, त्याचे खापर हिंदू धर्मीय गटावर फोडले होते. भेदभाव केला असल्याचा आरोप करुन नंतर कर्मचार्यांनी संप केला होता. त्यामुळे आयफेल टॉवर परिसरात शुकशुकाट होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीएपीएसने गुरुवारी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, आमच्या शिष्टमंडळाच्या भेटीवेळी आम्ही कधीही महिला कर्मचार्यांना घटनास्थळापासून आणि मार्गापासून दूर ठेवण्याची विनंती केली नाही. तरीही महिला कर्मचार्यांना दूर का ठेवले? याचा खुलासा संबधितांनी करावा. त्यामुळे याबाबत निर्माण झालेला संशयकल्लोळ दूर होण्यास मदत मिळेल. यामुळे परिस्थितीची अधिक चांगली माहिती मिळण्यास मदत होईल आणि यात सहभागी असलेल्या सर्वांना सन्मानपूर्वक पुढे जाणे शक्य होईल.
दरम्यान, या प्रकरणी एका स्वतंत्र संस्थेने केलेल्या तपासात उघड झाले की, महिला सुरक्षा कर्मचार्यांना हटविण्यामागे हिंदू धर्मीय गट नाही. यानंतर आयफेल टॉवर ऑपरेटिंग कंपनीच्या प्रमुख पॅट्रिक ब्रांको रुइवो यांनी पुढील वर्षी पायउतार होण्याची घोषणा केली होती. या मागे नेमके कोण होते? याचा अधिक तपशील उघड करण्याची मागणी आता हिंदू धर्मीय गटाने केली आहे.
Related
Articles
पाकिस्तान सरकार लष्कराचे बाहुले
05 Oct 2026
वैमानिक स्मित मच्छार जागतिक नायक : नेतन्याहू
05 Oct 2026
हवेली कार्यालयातील दस्तांच्या तपासणीत सव्वापाच लाखांचे मुद्रांक शुल्क कमी
06 Oct 2026
सोनेतस्करी ठरतेय व्यापार्यांची डोकेदुखी
06 Oct 2026
नायजेरियात लष्करी तळावर बंडखोरांचा हल्ला; १० सैनिकांचा मृत्यू
09 Oct 2026
वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायल अध्यक्षाचा शौर्य पुरस्कार
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान