उत्तर प्रदेशात ४० जणांना विषबाधा   

बलिया : उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात शुक्रवारी उपवासानिमित्त दूषित नाचणीचे पीठ खाल्ल्याने ३५ महिला आणि पाच मुलांना विषबाधा झाली. ही घटना बांसडीह रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ’छाता’ गावात घडली. बाधित महिलांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी, २० महिलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित बाधित महिला आणि मुले खासगी रुग्णालयात आहेत. सर्व महिलांची प्रकृती ठीक असून काळजीचे कारण नाही, असे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. के. यादव यांनी सांगितले.

Related Articles