E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शहरातील २४ स्थळे अजूनही अंधारात
Wrutuja pandharpure
03 Oct 2026
चतुःशृंगी, पाषाणसह अनेक भागांचा समावेश
पुणे
: बोपदेव घाटातील भीषण सामूहिक अत्याचार प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी शहरातील २७४ निर्जन जागांची यादी तयार करून महापालिकेला तिथे तातडीने सीसीटीव्ही आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या घटनेला तब्बल दोन वर्षे उलटूनही पुणे महापालिका प्रशासनाची अनास्था कायम असल्याचे उघड झाले आहे.
अजूनही २४ मुख्य निर्जन स्थळांवर अंधाराचे साम्राज्य असल्याचे मनपाच्या अहवालातून समोर आले आहे. यावरून शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत महापालिका प्रशासन कितपत गंभीर आहे, यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.दोन वर्षांपूर्वी बोपदेव घाटात घडलेल्या थरारक घटनेनंतर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पोलिसांनी शहराच्या सुरक्षेचा आढावा घेत २७४ निर्जन जागांवर सीसीटीव्ही आणि पथदिवे लावण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने प्रकाश व्यवस्था उभारण्याचे काम सुरु केले होते.
दरम्यान, आतापर्यंत पोलिसांनी दिलेल्या यादीतील १६५ ठिकाणी प्रकाश व्यवस्था करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. तर काही ठिकाणी आधीपासूनच दिव्यांची सोय असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तर आजही शहरातील २४ अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक ठिकाणे पूर्णपणे अंधारात असून याठिकाणी प्रकाश व्यवस्था करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या माहितीवरुन समोर आले आहे.
सुरक्षेकडे दुर्लक्ष
आगामी काळात केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा पुणे दौर्यावर येणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर महिला सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलिस आणि महापालिका प्रशासनाची रिव्ह्यू मिटिंग गुरुवारी पार पडली| यामध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या निर्जन स्थळांविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी महापालिका प्रशासनाने निर्जन स्थळांवर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार चतुःशृंगी आणि औंध-बालेवाडी परिसरातील महत्त्वाच्या निर्जन जागांवर अजूनही विजेचे खांब आणि दिवे बसवण्यात आलेले नाहीत.
पाषाण-सुतारवाडी येथील तलाव परिसरात अद्याप प्रकाश व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर बालेवाडी मिटकॉन कॉलेजमागील मोकळी जागा, बालेवाडी जुना जकात नाका व औंध गाव नदीपात्राचा परिसर अद्याप अंधारात असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर चतुःशृंगी टेकडीचा भाग वन विभागाच्या अखत्यारीत, तर पाषाण जलशुद्धीकरण केंद्र पाणीपुरवठा विभागाकडे असल्याचा तांत्रिक दावा करत महापालिकेच्या विद्युत विभागाने या ठिकाणी प्रकाश व्यवस्था करण्यास हात वर केले आहेत.
खासगी जागा आणि तांत्रिक त्रुटीचे रडगाणे
अद्याप प्रकाश व्यवस्था न झालेल्या २४ ठिकाणांबाबत विद्युत विभागाने नेहमीप्रमाणे तांत्रिक कारणे पुढे केली आहेत. काही जागा खासगी मालकीच्या आहेत, तर काही जागांचा ताबा महापालिकेकडे नाही, असा दावा प्रशासनाकडून केला आहे. मात्र, महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर असताना विविध विभागांमध्ये समन्वय साधून मार्ग काढण्याऐवजी प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
बोपदेव घाटातही महिला असुरक्षित
बोपदेव घाटातील घटनेनंतर प्रशासनाने सुरक्षेच्या मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. मात्र, दोन वर्षांनंतरही शहरातील प्रमुख निर्जन जागा अंधारातच असल्याने पुणेकर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Related
Articles
टिळक भवनात आदिवासी विद्यार्थ्यांना अटक
06 Oct 2026
नरसिंग गिरजी गिरणीची दगडी भिंत केली जमीनदोस्त
08 Oct 2026
युद्धनौकांना मदत करणार्या जहाजाचे जलावतरण
06 Oct 2026
ज्ञानेश कुमार यांच्या चौकशीचे केरळमच्या गृहमंत्र्यांचे आदेश
05 Oct 2026
झाडण कामाच्या प्रकल्पात ठेकेदार संस्थेचा हलगर्जीपणा
06 Oct 2026
महामार्ग पोलिस अंमलदार संतोष ननावरे यांची आत्महत्या
04 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान