E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
एनसीसीसाठी अकादमीची प्रतीक्षाच!
Wrutuja pandharpure
03 Oct 2026
राज्यात सुविधा आणि मनुष्यबळाचा प्रश्न
पुणे
: राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) विस्ताराबरोबरच छात्रांना आधुनिक लष्करी व तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात असला, तरी महाराष्ट्रात त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अद्याप अपुर्या आहेत. राज्यातील सात एनसीसी गटांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमी उभारण्याची आवश्यकता असताना अद्याप एकही अकादमी पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. अकादमीसाठी जागा तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा मुद्दा प्रलंबित असल्याचे एनसीसीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी स्पष्ट केले.
एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी पुणे मुख्यालयातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील एनसीसीच्या स्थितीची माहिती दिली. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये सुमारे अडीच हजार शाळा-महाविद्यालयांमधून सुमारे दीड लाख छात्र एनसीसीशी जोडलेले आहेत. राज्यात सात एनसीसी गट असून, प्रत्येक गटासाठी स्वतंत्र प्रशिक्षण सुविधा असणे आवश्यक आहे. सध्या मात्र प्रशिक्षणासाठी संबंधित शैक्षणिक संस्थांच्या उपलब्ध जागांचा आधार घ्यावा लागत आहे.
केंद्राच्या ‘विकसित भारत २०४७’च्या उद्दिष्टांच्या पार्श्वभूमीवर एनसीसीच्या प्रशिक्षणाचा आवाकाही बदलत आहे. सायबर सुरक्षा, ड्रोन तंत्रज्ञान, नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व विकास, आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक कार्य यांसारख्या विषयांचा प्रशिक्षणात समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी प्रयोगशाळा, प्रशिक्षण कक्ष, उपकरणे आणि इतर स्वतंत्र सुविधा आवश्यक आहेत. स्वतंत्र अकादमी नसल्याने या उपक्रमांचा विस्तार करताना अडचणी येत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
पुणे एनसीसी गटात सुमारे २० हजार छात्र आहेत. या छात्रांसाठी अकादमी उभारण्यासाठी जागा मिळावी, याबाबत राज्य सरकारशी चर्चा सुरू असल्याचे लेफ्टनंट जनरल वत्स यांनी सांगितले.महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या वर्षी राज्यातील पहिल्या एनसीसी अकादमीचे उद्घाटन झाले; मात्र ती अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई येथे सायबर डिफेंडर अभ्यासक्रम सुरू आहेत. नागपूर आणि मुंबई येथे ड्रोन प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. या सुविधांसाठी स्वतंत्र जागा आणि आवश्यक मनुष्यबळाची गरज आहे.
Related
Articles
मुंबईत दहा बस जळून खाक
06 Oct 2026
क्रिकेटच्या लोकप्रियतेनंतरही भारतात फुटबॉलची मोठी क्षमता : फोरलान
06 Oct 2026
जुन्नर-आंबेगावमध्ये दुष्काळसदृश स्थिती
05 Oct 2026
कॅन्टोन्मेंटच्या रस्त्यांवर आता महापालिकेचा झाडू
08 Oct 2026
शिवनेरी किल्ल्यावर ‘स्वच्छ भारत से स्वस्थ भारत’ मोहीम उत्साहात
05 Oct 2026
दुष्काळग्रस्त भागातील पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान