E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वैकुंठ स्मशानभूमीचे होणार विकेंद्रीकरण
Wrutuja pandharpure
03 Oct 2026
शहरात सात ठिकाणी गॅस दाहिनी उभारणार
पुणे
: शहराच्या मध्यवर्ती भागातील वैकुंठ स्मशानभूमीवर येणारा ताण कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून स्मशानभूमींचे विकेंद्रीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अंतर्गत शहराच्या समाविष्ट आणि विस्तारित ७ भागांमध्ये गॅस दाहिनी उभारण्याचा निर्णय विद्युत विभागाने घेतला होता. मात्र, बाहेरील भागांतील मृतदेहांचे या ठिकाणी दहन केले जाईल, असा दावा करत काही समाविष्ट गावांमधील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याचे आव्हान महापालिकेसमोर उभे आहे.
महापालिकेच्या विद्युत विभागाने म्हाळुंगे, महंमदवाडी, येवलेवाडी, उत्तमनगर, खडकवासला, खराडी आणि बाणेर या सात ठिकाणी गॅस दाहिनी उभारण्याचे नियोजन केले होते. यापैकी महंमदवाडी, खराडी आणि बाणेर येथील कामे पूर्ण झाली आहेत. म्हाळुंगे येथे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, येवलेवाडी, उत्तमनगर आणि खडकवासला येथे प्रशासनाला विरोधाचा सामना करावा लागला. येवलेवाडी येथील विरोध स्थानिक आमदारांच्या मध्यस्थीनंतर मावळला असला, तरी उत्तमनगर आणि खडकवासला येथे अजूनही नागरिकांचा विरोध कायम आहे.
नागरिकांना विश्वासात घेऊनच काम
मध्यवर्ती पेठ भागांतील वैकुंठ स्मशानभूमीवरील ताण कमी करण्यासाठी विविध भागांत गॅस दाहिनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. चार ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून आणि नागरिकांना विश्वासात घेऊन काम मार्गी लावले जाईल.
- मनीषा शेकटकर, प्रमुख, विद्युत विभाग, पुणे महापालिका
मांजरी, धायरी, नांदेड सिटी परिसरात गॅस दाहिनीची मागणी
एकीकडे काही भागांत विरोध होत असताना, दुसरीकडे स्थानिक पातळीवरील अडचणी दूर करण्यासाठी गॅस दाहिनी उभारण्याची मागणीही जोर धरत आहे. मांजरी, रामटेकडी, नांदेड सिटी, धायरी आणि सुतारवाडी येथील स्मशानभूमींमध्ये गॅस दाहिनी बसवण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे. यामध्ये नांदेड सिटी येथील स्मशानभूमीची जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. तर धायरी येथील स्मशानभूमीत नवीन तंत्रज्ञान युक्त दाहिनी उभारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
शास्त्रीनगर स्मशानभूमीचा ७.५ कोटींतून कायापालट
पेठ भागांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर कोथरूड परिसरात स्थायिक झाले आहेत. या भागातील कोणाचा मृत्यू झाल्यास नागरिक अंत्यसंस्कारासाठी वैकुंठ स्मशानभूमीत जातात. हा ताण कमी करण्यासाठी भवन विभागातर्फे कोथरूड येथील शास्त्रीनगर स्मशानभूमीचा ७.५ कोटी रुपये खर्च करून पुनर्विकास केला जाणार आहे. या ठिकाणी ३ लाकडी आणि १ गॅस दाहिनी उभारली जाणार असून, यामुळे वैकुंठ स्मशानभूमीवरील भार कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
Related
Articles
सेवा क्षेत्राची सप्टेंबरमध्ये प्रगती
07 Oct 2026
‘इंडिया’ आघाडीचे राजघाटवर आंदोलन
09 Oct 2026
शहरातील २४ स्थळे अजूनही अंधारात
03 Oct 2026
सलग दुसर्या दिवशी काँग्रेस आक्रमक
08 Oct 2026
महापौरांकडून दोन डॉग कॅचिंग वाहने खरेदीचे आदेश
08 Oct 2026
विधी प्रवेश अर्ज सादर करण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी आवश्यक
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान