E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मार्केटयार्डात ‘नो यूपीआय’आंदोलन यशस्वी
Wrutuja pandharpure
03 Oct 2026
पुणे
: व्यापार्यांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागात ‘नो यूपीआय डे’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला व्यापार्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापार्यांच्या सहकार्यामुळे आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाल्याची माहिती पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागातील अनेक व्यापार्यांनी यूपीआयद्वारे होणार्या डिजिटल पेमेंटचा स्वीकार न करता रोखीच्या व्यवहारांना प्राधान्य दिले. व्यापार्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन नाईलाजास्तव करावे लागले. व्यापार्यांच्या आर्थिक व्यवहारांवर अतिरिक्त भार निर्माण करणार्या निर्णयांबाबत शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. व्यापारी आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार सुरळीत राहणे ही बाजारपेठेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्हाला ‘नो यूपीआय डे’ आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.
या आंदोलनामध्ये चेंबरचे सर्व सभासद तसेच मार्केट यार्डातील अनेक व्यापारी सहभागी झाले होते. आंदोलनामुळे व्यापारी आणि ग्राहक या दोघांनाही काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला असून, त्याचा आर्थिक परिणामही झाल्याचे बाठिया यांनी नमूद केले.शासनाने व्यापार्यांच्या भावना व अडचणी लक्षात घेऊन यूपीआय व्यवहारांवर एमडीआर आकारणी करण्याचा निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा, अशी मागणी पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने करण्यात आली आहे. व्यापार्यांच्या हितासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा आणि भविष्यात व्यापारी व ग्राहक दोघांनाही अनावश्यक आर्थिक भार व गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी अपेक्षाही राजेंद्र बाठिया यांनी व्यक्त केली.
Related
Articles
कात्रज-कोंढवा रस्त्यावर रात्रभर पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट
08 Oct 2026
हरमनप्रीतची कप्तानपदावरून निवृत्ती
07 Oct 2026
राम मंदिराच्या देणगीतून भाजप आणि संघाने कार्यालये उभारली
05 Oct 2026
दुष्काळासाठी महाराष्ट्राला भरीव मदतीची ग्वाही
08 Oct 2026
हुथींविरोधात लष्करी कारवाईची सौदीची तयारी
04 Oct 2026
अमेरिकेत नोकरी महागणार; मोजावे लागणार ६८ लाख
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान