E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जिल्ह्यात टंचाईची चाहूल १७५ गावांसाठी पाणी नियोजनाला वेग
Wrutuja pandharpure
03 Oct 2026
पिण्याच्या पाण्यासाठी स्रोत राखीव ठेवणार
पुणे
: जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गावनिहाय पाणी नियोजनाला सुरुवात केली आहे. पहिल्या पाहणीत ११ तालुक्यांतील १७५ गावांमध्ये मागील काही वर्षांत सातत्याने पाण्याची गरज भासल्याचे समोर आले आहे. या गावांसह गेल्या वर्षी टँकर सुरू असलेल्या, सध्या टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या आणि आगामी काळात टँकरची आवश्यकता भासू शकणार्या गावांचा स्वतंत्र आढावा घेतला जात आहे.
सध्या बारामती, इंदापूर आणि दौंड या तीन तालुक्यांतील चार गावे व ५३ वाड्या-वस्त्यांना सात खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यावर १४ हजार ४५० नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविली जात असून, मंजूर सर्व १९ खेपा सुरू आहेत. बारामती तालुक्यातील दोन गावे आणि ४३ वाड्या-वस्त्यांमधील आठ हजार ३५० नागरिकांसाठी चार टँकरच्या १३ खेपा सुरू आहेत. इंदापूरमध्ये एका गावासह आठ वाड्या-वस्त्यांतील चार हजार ५०० नागरिकांना दोन टँकरच्या चार खेपांद्वारे पाणी दिले जात आहे. दौंडमध्ये एका गावासह दोन वाड्या-वस्त्यांतील एक हजार ६०० नागरिकांसाठी एका टँकरच्या दोन खेपा सुरू आहेत.
दुष्काळ जाहीर झालेल्या आठ तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यातील पाणीस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. उपलब्ध पाणीस्रोत, संभाव्य पाणीगरज आणि आवश्यक उपाययोजनांच्या आधारे टंचाई आराखडा तयार करण्यात येणार आहे. पहिल्या सर्वेक्षणात पुरंदर तालुक्यात सर्वाधिक ३४, त्याखालोखाल आंबेगावमध्ये २९ आणि जुन्नरमध्ये २८ गावांची नोंद झाली आहे.
पाणीस्रोत पिण्यासाठी राखीव
टंचाईच्या काळात पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे, यासाठी जिल्हा परिषदेचे पाझर तलाव, विहिरी आणि विंधन विहिरी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या स्रोतांतील पाणी केवळ पिण्यासाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाण्याचा विक्रीसाठी अथवा अन्य कारणांसाठी वापर होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
टंचाईची तीव्रता वाढण्यापूर्वीच गावनिहाय नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे गेल्या वर्षी टँकर सुरू असलेली, सध्या टँकर सुरू असलेली आणि आगामी काळात टँकरची आवश्यकता भासू शकणारी गावे निश्चित करून त्यानुसार आराखडा तयार केला जात आहे. उपलब्ध पाणीस्रोत आतापासूनच राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या स्रोतांमधील पाणी पिण्यासाठीच उपलब्ध राहील, याची दक्षता घेतली जाईल.
- वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद
टंचाई असलेल्या गावांची संख्या एकूण गावे १७५
तालुका
गावे
आंबेगाव
२९
हवेली
६
जुन्नर
२८
खेड
१९
पुरंदर
३४
भोर
१३
शिरूर
१६
इंदापूर
१४
दौंड
१
बारामती
१४
राजगड
१
एकूण
१७५
Related
Articles
पिके करपली, जमिनीला भेगा...
03 Oct 2026
भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी
09 Oct 2026
पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी
06 Oct 2026
सेमीकंडक्टर संशोधनाला उद्योग-शिक्षणाची जोड आवश्यक
04 Oct 2026
पदकांची लयलूट (अग्रलेख)
06 Oct 2026
चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सिंगीथम राव यांचे निधन
05 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान