E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जुना मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
Wrutuja pandharpure
03 Oct 2026
दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू , तर रिक्षाचालकासह तिघेजण जखमी
लोणावळा
: जुना मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा-लोणावळ्यादरम्यान राज ढाब्यासमोर दुचाकी आणि रिक्षाचा एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, रिक्षाचालकासह इतर तीनजण जखमी झाले आहेत.प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या सायन भागातून तिन तरुण दुचाकीवरून लोणावळ्यात फिरण्यासाठी आले होते. लोणावळ्याकडून पुन्हा मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना दुचाकी वरील नियंत्रण सुटून हे तिघे जण अत्यंत वेगाने विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन समोरून येणार्या एका रिक्षाला धडकले आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या क्रेनवर जाऊन आदळले. या धडकेत दुचाकीच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून रिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राँग साईडने वाहन चालवणे, ट्रिपल सीट प्रवास आणि अतिवेग यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच, महामार्गालगत बेशिस्तपणे उभी राहणारी वाहने आणि अवजड वाहनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणा अशा वाहनांवर कारवाई करणार का, असा सवाल संतप्त नागरिकांमधून विचारला जात आहे. जखमींवर सध्या नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Related
Articles
कोपर्डी अत्याचार प्रकरणात उच्च न्यायालयाकडून घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी
03 Oct 2026
उच्चशिक्षित हातांची कलात्मक जादू
08 Oct 2026
सोलापुरात ई-बस सेवेला वेग
05 Oct 2026
सीजेपीच्या आंदोलनात ममता सहभागी होणार?
09 Oct 2026
प्रणवीची गोल्फमध्ये सुवर्ण कामगिरी
04 Oct 2026
आयोगाने विश्वासार्हता गमावली
04 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान