E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
Samruddhi Dhayagude
03 Oct 2026
दिवेआगरसारख्या दुर्दैवी घटनेमध्ये हसतीखेळती तरुण मुले अचानक काळाच्या पडद्याआड जाणे हे त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि समाजासाठी अत्यंत वेदनादायी असते. त्यामुळे अशा सहलीत सर्वांची सुरक्षितता जपण्याला सर्वाधिक महत्त्व हवे.
कोकणच्या दिवे आगर येथे समुद्रात आळंदीचे आठ विद्यार्थी बुडून मरण पावल्याची घटना सुन्न करणारी आहे. ही घटना एखाद्या दुर्दैवी अपघाताची नाही, तर आपल्यातील बेजबाबदारपणाची आणि निष्काळजीपणाची आहे. आळंदी येथील एका खासगी शिकवणीवर्गात जाणार्या अकरावी बारावीच्या वर्गातील सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांना काळाने ओढून नेले. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या या विद्यार्थ्यांना पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. सहलीत सामील झालेल्या ४२ जणांना आणि मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना या दुर्दैवी घटनेने केवढा धक्का बसला असेल याची कल्पना न केलेली बरी. स्थानिक नागरिक आणि जीवरक्षक दलाने या विद्यार्थ्यांना वाचवण्याचे केलेले प्रयत्न फोल ठरले. दिवेआगर, श्रीवर्धन, केळवा, तारकर्ली आणि गणपतीपुळे यांसारख्या समुद्र किनार्यावर पर्यटक मौजमजा करायला जातात. अतिरेकी उत्साहात काहीजण जलपर्यटनाचा अनुभव घेतात; मात्र अनेकदा ओहोटीच्या प्रवाहाचा किंवा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने असे दुर्दैवी मृत्यू घडल्याच्या बातम्या येतात. पुण्याच्या एमआयटी कॉलेजचे विद्यार्थी सहलीसाठी मुरूडच्या समुद्र किनार्यावर गेले असता त्यावेळी १४ विद्यार्थी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना दहा वर्षांपूर्वी घडली होती. देवगडमध्येही अशीच घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. एखादी शैक्षणिक संस्था किंवा खासगी शिकवणी वर्ग अशा समुद्र किनार्याच्या सहलीचे आयोजन करते तेव्हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार होतो की नाही असा प्रश्न पडतो. विद्यार्थ्यांसमवेत किती शिक्षक होते, पाण्यात पोहण्याचा आनंद घेऊ पाहाणार्या विद्यार्थ्यांना पोहता येते का, जीवरक्षक जॅकेट होते का, स्थानिक मच्छीमार किंवा पोलिसांना पाण्याच्या प्रवाहाच्या स्थितीबद्दल विचारणा केली होती का असे प्रश्न घटना घडल्यावर पडतात. समुद्रात पोहताना हा पोहण्याचा तलाव नाही याचे भान आणि जाणीव न ठेवता, काहीच होणार नाही, आणखी थोडे पुढे जाऊ हा अति आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जबाबदारी संस्थेची
सहलीसाठी जाणार्या विद्यार्थ्यांना समुद्र किनार्यावरील वातावरणाची पूर्व कल्पना द्यायला हवी. नदी किंवा तलावापेक्षा समुद्रातील पाण्याची स्थिती वेगळी असते. भरती-ओहोटीच्या वेळी वेगाने उसळणार्या लाटांची कल्पना त्यांना द्यायला हवी. शिक्षक किंवा मार्गदर्शकांनी समुद्रकिनार्यावर विद्यार्थ्यांना पोहण्यासाठी जाण्यापासून रोखले असते, तर ही दुर्घटना कदाचित टळली असती. खरेतर सहलीचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वौच्च प्राधान्य, शैक्षणिक संस्थांनी द्यायला हवे. बर्याचदा विद्यार्थ्यांचे साहस करण्याचा स्वभावही अशा दुर्घटनांचे कारण ठरतो. सेल्फी काढण्याच्या नादातही अनेकदा जीवघेणे अपघात घडतात. धोक्याची ठिकाणे, अपघात प्रवण भागात धोक्याची पूर्व सूचना देणारे फलक लावले असूनही अनेकदा त्याकडे केलेले दुर्लक्ष अपघाताचे निमित्त ठरते. सर्व प्रमुख समुद्र किनार्यावर कायमस्वरूपी जीवरक्षक आणि मदतीसाठी छोट्या बोटी यांची व्यवस्था कायमस्वरूपी असणे आवश्यक ठरते. दिवेआगरच्या घटनेनंतर आता विद्यार्थी संख्येच्या तुलनेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे शिक्षक किंवा जबाबदार व्यक्ती त्यांच्यासोबत होती का, त्यांच्याकडून सुरक्षा नियमांचे पालन झाले का याची तपासणी केली जाणार आहे. घटना घडल्यानंतर चौकशीचे सोपस्कार नेहमीच होतात; पण त्यातून बोध कोणीच घेत नाही. या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी पार पाडण्यात निष्काळजीपणाच झाला असण्याची शक्यता यात दिसते. विद्यार्थ्यांना खोल पाण्यात जाऊ न देण्याची जबाबदारी शिक्षण संस्थांची असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. तसे असेल तर या शैक्षणिक संस्थेवर काय कारवाई करणार हे स्पष्ट व्हायला हवे. बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणातून अशा घटना घडतात, हे थांबायला हवे.
Related
Articles
पर्यावरण संदेश घेऊन वसुंधरा दिंडी नागपूरहून सोलापुरात
07 Oct 2026
ज्ञानेश कुमार यांच्या चौकशीचे केरळमच्या गृहमंत्र्यांचे आदेश
05 Oct 2026
एनसीसीसाठी अकादमीची प्रतीक्षाच!
03 Oct 2026
उच्चशिक्षित हातांची कलात्मक जादू
08 Oct 2026
दिल्लीतील सीमापुरी परिसरात बहुमजली इमारत कोसळली
08 Oct 2026
वैमानिक मच्छार यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया यशस्वी
07 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
आयोगाने विश्वासार्हता गमावली
5
मानापमानाच्या पलीकडचे समाधान
6
साखरेचे दर कमी होणार?